वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील मठ श्री स्वयंमेश्वर प्रा.वि.का. स. सेवा सोसायटी लि.मठ या संस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२१-२२ ते २०२६ -२७ ची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून मंगळवार दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे.या निमित्ताने ‘श्री स्वयंभू कृपा गाव विकास पॅनल’ निवडणूक रिंगणात असून या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.दरम्यान मठ श्री स्वयंमेश्वर सोसायटीच्या या पंचवार्षिक निवडणुकीत ‘श्री स्वयंभू कृपा गाव विकास पॅनल’ विजयी होण्यासाठी विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.विद्यमान चेअरमन सुभाष चंद्रकांत बोवलेकर यांनी गेली ५ वर्षे कार्यरत असताना सुरुवातीची ३ वर्षे संचालक व नंतर चेअरमनपदी कार्यरत राहून संस्थेच्या प्रगतीकरिता प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यांनी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व जनतेच्या हितासाठी विविध योजना राबविल्या आहेत.सन २०१९-२० या आर्थिक वर्षात
सर्व सभासदांकरिता भेट वस्तू वाटप केले आहे.संस्थेवर कोणताही बोजा खर्च न टाकता
संस्थेकरिता बोअरवेल खोदून पाण्याची सोय केली आहे. (बाहेरील देणगी द्वारे खर्च सुमारे एक लाख रुपये पर्यंतचे काम केले). संस्थेचे छप्पर (वरचा मजला) करून सभासदांसाठी निवास सोय उपलब्ध केली व इमारतीची स्लॅब गळती थांबविली. सभासदांना मागणीप्रमाणे कर्जपुरवठा करुन आर्थिक गरजा वेळच्या वेळी पूर्ण केल्या आहेत.

मागणी केलेल्या कोणत्याही सभासदास कर्जापासून वंचित ठेवलेले नाही. पीक विमाभरपाई मिळवून दिली. संस्थेची इमारत रंगरंगोटी करून सुशोभीकरण केले. रेशन दुकान वरील धान्य हे महिन्याच्या अखेरीपर्यंत उपलब्ध असल्याने ग्रामस्थांना चांगली सुविधा दिली जात आहे.त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर संस्थेचा कारभार हातात घेऊन बँकेच्या तसेच सहकार खात्याच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घेऊन संस्थेची जास्तीत जास्त प्रगती केली आहे.कर्जव्यवहार वाढीबरोबरच नफावाढीकडे लक्ष पुरवून संस्थेला आर्थिक बळकटी व मजबुती देण्याचे काम करण्यात आलेले आहे. संस्थेची आर्थिक स्थिती सुधारून आज बँकेकडे कर्ज मागणी केल्याबरोबर कोणतीही अट न लागता मागणीप्रमाणे कर्ज पुरवठा केला जातो, अशी मजबूत स्थिती निर्माण केलेली आहे.सन २०१५ च्या निवडणुकीत सुभाष बोवलेकर यांची संचालक मंडळावर सदस्यपदी नियुक्ती झाली.

त्यावेळी पूर्वीच्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत धान्य विभागाची आर्थिक स्थिती पाहता १.६८ लाखाने धान्यविभाग नफ्यात होता. त्यानंतर सन २०१५-१६,२०१६-१७, व २०१७ -१८ या आर्थिक वर्षात धान्य विभागाची स्थिती हळूहळू सुधारत जाऊन सन २०१७-१८ अखेर त्यात फारसा अपेक्षित बदल झाला नाही. नफा जास्तीत जास्त १.८० लाखांपर्यंत गेला. मात्र सुभाष बोवलेकर यांनी चेअरमन झाल्यावर सन २०१८-१९
या आर्थिक वर्षात नफ्याचे प्रमाण ०.९८ लाखांने वाढून एकूण नफा २.७८ लाख एवढा झाला. आज अखेर धान्य विभागाचा नफा ६,९७,६६३ रुपये असून त्याची नियोजनबद्ध बँकेत गुंतवणूक ८ लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे.संस्थेची सन २०१८-१९ या वर्षात किराणा विभाग सुरू करून सभासदास गृहपयोगी वस्तू पुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले.परंतु व्यापारी स्पर्धेत संस्था कमी पडल्याने किराणा विभागात अपेक्षित विक्री उलाढाल होऊ शकलेली नाही. त्यात संस्थेस नफा व तोटा झाल्याने किराणा विभागात केलेली गुंतवणूक व्यापारी देणी, किराणा विभागावर होणारा खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेवटी संस्थेला सदर विभाग बंद करण्याची वेळ आली. मात्र संस्थेकडे असलेल्या शिल्लक माल खराब होऊन संभाव्य नुकसान होण्याची वेळ संस्थेवर येऊन ठेपल्यामुळे सुभाष बोवलेकर यांनी सहकारी संचालकांसमवेत चर्चा करून सदर किराणा दुकान भाडेतत्वावर देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या व सदर दुकान दरमहा २ हजार रुपये भाड्याने देण्याचे ठरवून आज संस्थेवर काहीही खर्च न करता वार्षिक २४ हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळत आहे.

एकंदरीत सुभाष बोवलेकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने संस्थेसाठी चांगले योगदान दिले आहे.२२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत ‘श्री स्वयंभू कृपा गाव विकास पॅनल’ चे उमेदवार निवडणूक रिंगणात असून
सुभाष बोवलेकर यांच्यासह सहा विद्यमान सदस्य, यामध्ये देवेंद्र लक्ष्‍मण गावडे, कानु परशुराम गावडे, सिताराम भास्कर गावडे, शंकर तुकाराम गावडे, शिवानंद वासुदेव गावडे, दत्‍ताराम नारायण होडावडेकर, यशवंत चिंतामण नाईक, गुंडू बोमडोजी ठाकूर, संध्या बाबुराव वालावलकर, सुभाष वामन मठकर, सुभाष चंद्रकांत बोवलेकर आदी सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.प्रत्येकी १ याप्रमाणे ११ मते असून ‘आंबा’ या निशाणीवर शिक्का मारुन पुढील ५ वर्षे सेवा करण्याची संधी द्यावी,असे आवाहन श्री स्वयंभू कृपा गाव विकास पॅनल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page