कुडाळ /-

धीरज परब मित्रमंडळाच्या माध्यमातुन मागील चार वर्षे सातत्याने आम्ही समाजपयोगी उपक्रम राबवत आहोत. या मध्ये ग्रामीण भागातुन आरोग्य शिबीरे घेण्यात आली. शहरी भागामध्ये विविध अवयवांचे तज्ञ डॅाक्टर खाजगी रुग्ण सेवा देतात. अशा नामांकीत डॅाक्टरांना ग्रामीण भागात नेवून मोफत सेवा दिली, रुग्णाना औषधे तसेच त्यांची मोफत रक्त तपासणी केली. करोना काळात रुग्ण/ व नातेवाईक यांच्या अडचणींमध्ये भरीव मदत कार्य केले. त्याच प्रमाणे या वर्षी धीरज परब मित्र मंडळाच्या वतीने बाल महोत्सवाचे आयोजन करीत आहोत. करोना काळात गेली दोन वर्षे विदयार्थी आणि शाळा यांचा संपर्क तुटला होता.शिक्षक शाळांमध्ये विदयार्थांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी म्हणून विविध स्पर्धा घेत असतात, स्वाध्याय घेत असतात. यामुळे विदयार्थांच्या अंगीभूत गुणांना वाव मिळत असतो. करोना काळात या सर्वांवर काहीसे दुर्लक्ष झाले. याच गोष्टीचा विचार करुन दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी बाल महोत्सव आयोजीत करत आहोत. या मध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील.

प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकाना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धांसाठी नाव नोंदणी आवश्यक असून प्रवेश मर्यादीत आहेत. प्रवेश नोंदणी दि. 24/2/2022 सायं. 5 वाजेपर्यंत करावी.
प्रवेशासाठी संपर्क 1) 9404232559 – भोई सर
2) 9404918098 – नाईक सर
3) 9422014399 – परब सर
यामध्ये सकाळी 10.30 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धकांना दुपारी भोजन व्यवस्था ही ठेवण्यात आली आहे. मुलांचे हस्ताक्षर सुधारावे या दृष्टीने हस्ताक्षर तज्ञ श्री. विकास गोवेकर सर यांचा
” हस्ताक्षर कसे सुधारावे? या प्रात्यक्षिक अभ्यासवर्गाचे पालक व विद्यार्थी यांच्या साठी आयोजन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमा दरम्यान मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासा वर आधारित लघुपट दाखविण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी कुडाळातील नामांकीत चिमणी पाखरे डान्स अकॅडमीचा “जलवा, 2022 हा प्रोफेशनल डान्सरचा डान्स शो आयोजीत केला आहे.

कार्यक्रम स्थळ- बॅ. नाथ पै. शैक्षणिक भवन, कुडाळ एम. आय. डी. सी. च्या भव्य परिसरामध्ये.

कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे –
*10.30 वा. पासून रजिस्ट्रेशन व विविध स्पर्धांना सुरवात.
*कार्यक्रमा दरम्यान मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासा वर आधारित लघुपट…
*दूपार1 वा. ते 2वा. स्पर्धकांना जेवण व्यवस्था .
*2 वा. ते 3 वा. श्री. विकास गोवेकर सर यांचा हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग व अक्षर संस्कार पुस्तक विक्री .

  • 3 वा. ते 5वा. विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व जलवा 2022(डान्स शो)
    *बालगट (चित्रकला) वय 12 वर्षांचा आतील (कोणताही एक विषय) विषय –: 1) आवडता पक्षी
    2) आवडता प्राणी
    3) माझी शाळा
    वरील पैकी एक विषय-: ड्रॅाईंग पेपरवर आयोजकांतर्फे पेपर पुरविले जातील.
    स्पर्धकाने आवश्यक ते साहीत्य सोबत आणावयाचे आहे.

बक्षीस -: प्रथम क्र. रु.1000/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
व्दितीय क्र. रु. 700/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय क्र. रु. 500/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ रु. 300/- व प्रमाणपत्र

सुचना – 1) वेळ दोन तास.
2) रंगीत रंगातील चित्र असावे.
3) परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील

कुमारगट –: (चित्रकला स्पर्धा) 12 ते 15 वर्षे वयोगट (कोणताही एक विषय)

विषय –1) वृक्षारोपण करणारी मुले
2) किल्ला स्वच्छता मोहीम
3) आदर्श गाव
• वरीलपैकी एकाविषयावर रंगीत चित्र.
• ड्रॅाईंग पेपर आयोजकांतर्फे पुरविले जातील.
• आवश्यक ते साहीत्य स्पर्धकांने सोबत आणावयाचे आहे.

बक्षीस – 1) प्रथम क्र. 1500/- रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
2) व्दितीय क्र. 1000/- रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
3) तृतीय क्र. 700/- रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
4) उत्तेजनार्थ – रु. 500/- व प्रमाणपत्र

सुचना – 1) वेळ दोन तास.
2) रंगीत चित्रच असावे.
3) परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील.

वक्तृत्व स्पर्धा – बालगट-12 वर्षा आतील (कोणताही एक विषय)
विषय – 1) मला शाळेत जायचय
2) माझे प्रेरणास्थान
3) शिवचरीत्र- एक संस्काराचा धडा

बक्षीस – 1) प्रथम क्र. 1000/- रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
2) व्दितीय क्र. 700/- रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
3) तृतीय क्र. 500/- रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
4) उत्तेजनार्थ 300/- रु. व प्रमाणपत्र

नियम/ सूचना- 1) भाषणवेळ 3 मिनिट साधारण.
2) न बघता भाषण करणे अपेक्षित.
3) परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील.

वक्तृत्व स्पर्धा – (किशोरगट) 12 ते 16 वर्ष वयोगट (कोणताही एक विषय)

विषय- 1) ऑनलाईन शिक्षण फायदे- तोटे
2) आपले आरोग्य आपल्या हाती
3) भारतीय संस्कृती आणि सद्यस्थिती.

बक्षीस – 1) प्रथम क्र. रोख रु. 1100/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
2) व्दितीय क्र. रोख रु. 800/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
3) तृतीय क्र. रोख रु. 600/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
4) उत्तेजनार्थ – रोख रु. 300/- व प्रमाणपत्र

नियम सुचना – 1) भाषणवेळ 5 मिनिट साधारण.
2) न बघता भाषण अपेक्षित.
3) परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील.

पाठांतर स्पर्धा (बालगट) 12 वर्षाआतील (कोणताही एक विषय)

विषय – 1) मनाचे श्लोक
2) पाढे पाठांतर 10 ते 20
3) गीताई/ एक अध्याय
4) पावकी/ निमकी पाठांतर
5) पाऊणकी/ सवाईकी पाठांतर

बक्षीस – 1) प्रथम क्र. रु. 700/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
2) व्दितीय क्र. रु. 500/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
3) तृतीय क्र. रु 300/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
4) उत्तेजनार्थ रु. 100/- व प्रमाणपत्र

नियम- 1) वेळ 3 मिनिट साधारण.
2) न बघता पांठातर अपेक्षित
3) परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील
संपर्क- 9637833638
*अध्यक्ष- सचिन गुंड
*कार्यवाह-सुशांत परब
*सचिव- प्रथमेश धुरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page