सिंधुदुर्ग /-

कुडाळ पंचायत समितीमध्ये लाखो रुपये खर्च करून,महिलांसाठी बांधण्यात आलेल्या “अस्मिता कक्षाच्या” खर्चाची अखेर तातडीने आठदिवसांत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य शिक्षण सभापती सौ.डाॅ.अनिशा दळवी यांनी दिले आहेत.

तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनेही जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर,जिल्हा उपाध्यक्ष समिल जळवी,जिल्हा कार्यकारणी सदस्य मिलिंद धुरी,आनंद कांडरकर या सर्वानी २८ जानेवारी रोजी कुडाळ पंचायत समितीमध्ये महिलांसाठी बांधण्यात आलेल्या या “अस्मिता कक्षाची”पहाणी करून,महिलांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत सोशल मिडीयावर वृत्त प्रसिद्ध करून,याबाबत आवाज उठवला होता.

कुडाळ पंचायत समिती मध्ये “अस्मिता कक्ष” अक्षरशःधूळ खात पडला आहे.असे असताना देखील पंचायत समितीच्या माध्यमातून याच कक्षावर दोन वेळा लाखो रुपयांचा निधी खर्च करून,उधळपट्टीे करण्यात आली आहे.मात्र प्रत्यक्षात तो कक्ष बंद अवस्थेत असल्याने महिलांना वापरता येत नाही.तर या “अस्मिता कक्षाच्या” दरवाजाच्या दर्शनी दरवाजाखाली मोठे भगदाड पडले आहे.तसेच काही वर्षांपूर्वी कुडाळ पंचायत समितीच्या वतीने महिलांसाठी बांधण्यात आलेल्या याच कक्षाचे नाव “हिरकणी कक्ष” म्हणून देण्यात आले होते.यावेळी २ लाख ४२ हजार रुपये खर्च केले होते.तर त्यानंतर पुन्हा या कक्षाचे नाव बदलून,आता याच कक्षाचे नाव “अस्मिता कक्ष”असे करण्यात आले आहे.यावर १ लाख ६४ हजार रुपये निधी खर्च करण्यात आला आहे.तर बॅनरवरही हजारो रुपयांची उधळपट्टी झाली आहे.याबाबत कुडाळ सभापती नूतन आईर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते.तर एकाच जागी दोन वेळा झालेल्या खर्चाची तातडीने चौकशी करा व अहवाल सादर करा असा एकमुखी ठराव घेत याबाबतचे आदेश आरोग्य शिक्षण सभापती सौ.अनिशा दळवी यांनी संबंधित अधिकारी अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले आहेत.
     
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा परिषद छञपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती सौ.डॉ.अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मंगळवार दि.८ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे, समिती सदस्य लॉरेन्स मान्येकर,सदस्य प्रितेश राऊळ,उन्नती धुरी,कुडाळच्या सभापती समिती सदस्या सौ. नूतन आईर, डॉ संदेश कांबळे तसेच अन्य खातेप्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.यावेळी आरोग्य समिती सर्वसाधारण सभेमध्ये कुडाळ पंचायत समितीचे गटविकास गटविकास अधिकारी यांनी यशवंत पंचायतराज बक्षीस रक्कमेतून महिलांसाठी पूर्वीच्या कक्षेला “हिरकणी कक्ष”नाव देऊन मार्च २०१९ ला २ लाख ४२ हजार रुपये काम न करता खर्च केले.त्यानंतर त्याच कक्षला “अस्मिता कक्ष” नाव देउन ऑगस्ट २०२० ला त्यावर १ लाख ६४ हजार खर्च दाखविला गेला. याची तातडीने सखोल चोकशी करून, अहवाल सादर करावा असा आदेश देत तसा एकमुखी ठराव करून,मंजूर करण्यात आला आहे.

तर रेडी येथील त्या वैद्यकीय अधिकाऱ्यास ७ दिवसांची नोटीस बजावण्यात येणार असून त्यांनरही ते पूर्ण वेळ उपस्थित न राहिल्यास सेवासमाप्तीची नोटीस देण्यात येणार :-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये दोन डॉक्टर कार्यरत आहेत. या डॉक्टरांना २४ तास वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच त्यांना त्या ठिकाणी राहण्यासाठी कॉर्टर्स ही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मात्र वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून ते पूर्ण वेळ पीएचसी मध्ये उपस्थित राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार होत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी सांगितले. तसेच याआधी याबाबत तक्रार ही करण्यात आली होती. मात्र त्यांना पूर्ण वेळ हजर राहावे याबाबतचे पत्र पाठविण्यात आले. मात्र पत्र पाठवूनही त्यांमध्ये काहीही बदल झालेला दिसून आलेला नाही. त्यामुळे आता यांवर काय कारवाई करण्यात येणार असल्याची विचारणा प्रितेश राऊळ यांनी यावेळी केली. यावर या वैद्यकीय अधिकाऱ्यास ७ दिवसांची नोटीस बजावण्यात येणार असून त्यांनरही ते पूर्ण वेळ उपस्थित न राहिल्यास सेवासमाप्तीची नोटीस देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी आज पार पडलेल्या जिल्हा परिषद आरोग्य समिती सभेत सांगितले.
           
पीएचसी मध्ये प्रसूती झालेल्या महिला औषोधोपचार करण्यासाठी येतात. त्यामुळे अशा महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी प्रत्येक पीएचसी मध्ये वेगळा कक्ष स्थापन करण्यात यावा, याबाबतचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ पीएचसी मध्ये स्तनपान कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील ९८ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ७८ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला असल्याची माहिती डॉ खलीपे यांनी दिली. तसेच ६ हजार ५४० नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. १५ ते १८ वयोगटातील ३५ हजार ८०४ मुलांना पहिला डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. तर ३ फेब्रुवारी पासून दुसऱ्या डोसचे लसीकरण चालू करण्यात आले आहे. पहिल्या डोस साठी ९४ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तर औषधे खरेदी, सर्पदंश औषध खरेदी, साथरोग प्रतिबंधक योजना यांसाठी ८६ लाख रुपयांची औषध खरेदी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी दिली.
     
साटेली भेडशी आरोग्य केंद्राचे काम ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र गेली दीड वर्ष हे काम अर्धवट स्थितीतच ठेकेदारावर प्रतिदिन ५०० रुपये दंडाची होणार कारवाई

दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी आरोग्य केंद्राचे काम ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र गेली दीड वर्ष हे काम अर्धवट स्थितीतच आहे. संबंधित ठेकेदाराला वारंवार सूचना करूनही काम पूर्ण करण्यात आले नाही. याकरिता प्रतिदिन ५०० रुपये दंडाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page