सावंतवाडी /-

वेंगुर्ला, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही तालुक्यांना जोडणारा किंबहुना तिन्ही तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेला वेंगुर्ला-आकेरी-बेळगाव राज्य महामार्ग क्रमांक 180 ( 6/00 ते 21/200) पर्यंतच्या राज्य महामार्गाची सहाय्यक अभियंता श्रेणी 1, सार्वजनिक बांधकाम विभाग, वेंगुर्ला यांच्या मालकीच्या रस्त्याची सदर कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे व बेजबाबदारपणे केलेल्या दुर्लक्षामुळे वेंगुर्ला शहर, मठ, आडेली, वजराट, झाराप, नेमळे, आकेरी, कोलगाव, सावंतवाडी शहरामधील सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

सदरील रस्त्याबाबत दिनांक 3/2/22 रोजी तातडीची बैठक स्वामी समर्थ हॉल, नेमळे येथे घेण्यात आली होती, याच बैठकीत एकमताने ठरल्याप्रमाणे आज दुपारी 12 वाजता कार्यकारी अभियंता, सावंतवाडी यांची पूर्वनियोजित वेळ घेऊन ठरल्याप्रमाणे 10 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळ जाब विचारणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची भयावह परिस्थिती लक्षात घेता PWD विभाग आणि ठेकेदार यांची मनमानी आणि विकृत कार्यपद्धती यावर वेसण घालण्याची वेळ आली असून मागील 2 महिन्यापासून प्रत्येक आम आदमी ज्या ज्या ठिकाणी निकृष्ट व खालच्या दर्जाचे काम चालू आहे त्या ठिकाणी स्वतः उभा राहून जाब विचारत आहे तसेच चांगले काम होण्यासाठी बारीक लक्ष ठेऊन आहे.

लवकरच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे शिष्टमंडळ नाम. श्री. अशोक चव्हाण साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची भेट घेणार असून राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग याबाबत संपूर्ण जिल्ह्याचा रस्त्याच्या वस्तूस्थितीचा अहवाल देण्यात येणार आहे.

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय मार्गांची तातडीने सुधारणा व नूतनीकरण व्हावे यासाठी सर्व जबाबदार नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी एकजूट दाखवून हा निकराचा लढा यशस्वी होण्यासाठी मानसिक पाठबळ व आधार द्यावा असे आवाहन श्री. नंदन वेंगुर्लेकर, सचिव – आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग, श्री. तुलसीदास ठाकूर, सरपंच- मठ, श्री. महेश राणे, सरपंच- वजराट, सौ. प्राजक्ता मुंडये, सरपंच- आडेली, श्री. विनोद राऊळ, सरपंच- नेमळे, सौ. स्वाती तेंडोलकर, सरपंच-झाराप, श्री. महेश जामदार, सरपंच-आकेरी, श्री. अनुप नाईक, सरपंच-हुमरस, श्री. प्रवीण कोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page