“ढ मंडळींनी ” खऱ्या अर्थाने इतिहास घडवला..मनसेकडून गौरवोद्गार”

कुडाळ /-

पनवेल येथे पार पडलेल्या अटल करंडक 2022 या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कुडाळ मधील “ढ” मंडळीनी महाअंतिम फेरीत सादर केलेल्या “बिलिमारो” या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत राज्यात बहुमान मिळवल्याने मनसेच्या वतीने शाल,श्रीफळ व कलेचा ईश्वर श्री देव कलेश्वराची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,जिल्हा सचिव बाळा पावस्कर,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी,उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे,जगन्नाथ गावडे,अविनाश अणावकर,नेरूर विभाग अध्यक्ष भूषण परब,अक्षय जोशी,रोशन चव्हाण,वैभव धुरी,गजानन राऊळ,अमोल जंगले आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. “ढ” मंडळींनी राज्यात इतिहास घडवल्याने खरं तर “ढ” ची प्रतिमा उजाळली असे गौरवोद्गार काढत आगामी काळात “बिलिमारो” टीमच्या सदस्यांना मराठी नाट्यसृष्टी व चित्रपटसृष्टी स्तरावर मदत व मार्गदर्शन लागल्यास मनसे चित्रपट संघटनेच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी बोलताना दिली. आगामी काळात अशीच कौतुकाची थाप सदैव पाठीवर राहू द्या अशी भावना व्यक्त करत “बिलिमारो” टीमच्या सदस्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page