महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पाहणी केली असता निदर्शनास..

कुडाळ /-

कुडाळ पंचायत समितीचा अस्मिता कक्ष लाखोंरूपये खर्च करून देखील बंद अवस्थेत दिसत आहे.आज २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पाहणी केली असता “अस्मिता कक्ष ” हा बंद अवस्थेत असलेला दिसत आहे,असे निदर्शनास आले.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर , जिल्हा उपाध्यक्ष समील जळवी ,जिल्हा कार्यकारणी सदस्य मिलिंद धुरी,जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद कांडरकर उपस्थित होते.

कुडाळ पंचायत समितितील अस्मिता कक्ष अक्षरशा गेली दोन वर्षे धूळ खात आहे असे दिसत आहे.असे असताना देखील शासनाच्या माध्यमातून या कक्षावर लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचे दिसून येत आहे.मात्र प्रत्यक्षात मात्र प्रत्यक्षात तो कक्ष बंद अवस्थेत दिसून येत आहे.काही वर्षांपूर्वी याच कक्षाचे नाव हे हिरकणी कक्ष म्हणून नावारूपाला होते त्याचे आता त्या कक्षाचे नाव बदलून अस्मिता कक्ष देण्यात आले आहे.आणि अस्मिता कक्ष या नावाने पोस्टर देखील लावले आहेत.शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा करून फक्त बॅनरबाजी केली जात आहे असे चित्रं अस्मिता कक्षाचे दिसत आहे.

एकीकडे शासन महिलांना सक्षम व सबलीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर वेगवेगळ्या योजना राबवून समाजातील महिलांना सक्षम करण्यासाठी योजना राबवताना दिसत आहे.शासनाचा एकीकडे महीला सक्षमीकरण करा असा नारा आहे तर, दुसरीकडे कुडाळ पंचायत समितीमध्ये “अस्मिता कक्ष ” हा पूर्णबंद अवस्थेत दिसून येत आहे.या कक्षाच्या दरवाज्याच्या खालील भागात मोठे भगदाड पडलेले आहे.मात्र मात्र या कक्षावर शासनाचा भरमसाठ निधी बराच वेळा खर्च केल्याचा बोलले जात आहे,अशी चर्चा रंगू लागली आहे,मात्र गेली दोन वर्ष पंचायत समितीमध्ये दिलेले लोकप्रतिनिधी म्हणजेच सत्ताधारी आणि विरोधक याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.या अस्मिता कक्षावरून असे दिसून येत आहे महिलांना मान सन्मान मिळत नसेल तर मग या प्रतिनिधीना जनतेने निवडून का द्यावे अशी चर्चा नागरिकांनमद्धे होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page