राष्ट्रीय सुवर्णबाण कबबुलबुल परिक्षेत यावर्षीही दोन विद्यार्थी उतीर्ण


वेंगुर्ला /-

जि. प.प्राथ.शाळा मातोंड वरचेबांबर ही ग्रामीण भागातील एक उपक्रमशील शाळा असून भारत स्काऊट गाईड अंतर्गत कबबुलबुल युनिट दरवर्षी राज्य, राष्ट्रीयस्तरावर यश संपादन करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात गणेश उदय परब व क्रुष्णा आनंद कोरगावकर हे दोन विद्यार्थी राष्ट्रीय सुवर्णबाण कबबुलबुल परिक्षेत उतीर्ण झाले असून संतोषी फटू सावंत हिचा बुलबुल विभागाचा निकाल बाकी आहे. या चिमुकल्याचे कौतुक करत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मा. आमदार तथा माजीपालकमंत्री दीपक केसरकर यांनी शाळेच्या सर्व कबबुलबुल युनिटला स्काऊट गणवेशसाठी रोख रक्कम कबमास्टर श्री. सुभाष साबळे यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंंदनपर पत्राद्वारे सिंधुदुर्ग भारतस्काऊट गाईडच्या सरचिटणीस स्नेहलता राणे, जिल्हा गाईड संघटक शुभांगी तेंडोलकर प्राथ.शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख,गटसाधन केंद्राचे विषय तज्ज्ञ मिलिंद टिळवे,सर्वेश राऊळ, केंद्रप्रमुख श्री लवू चव्हाण, मातोंड सरपंच सौ.जानवी परब ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकिशोर परब , मुख्याध्यापक श्री पवन अहिरे,पालक ,ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page