वेंगुर्ला / –

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा कार्यक्रमनिमित्त जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व अभियंता यांनी वेंगुर्ले न.प. च्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाला भेट दिली.यावेळी अधिकाऱ्यांनी येथील प्लांटबाबत माहिती घेत  प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.जि.प.सिंधुदुर्ग व पं. स.वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त जलजीवन मिशन आणि सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन यावर वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात दोन दिवशीय जिल्हास्तरीय निवासी कार्यशाळा संपन्न झाली.या दरम्यान पदाधिकारी यांनी वेंगुर्ले न.प. च्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाला भेट देऊन माहिती घेतली.यावेळी वेंगुर्ले नगरपरिषदेचे अभियंता सचिन  काकड यांनी घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन याबाबत माहिती दिली व मार्गदर्शन केले.कचरा वर्गीकरण, कचऱ्याच्या संकलन पद्धती,ओला – सुका कचऱ्यावरील प्रक्रिया याबाबत विस्तृत माहिती दिली.यावेळी अधिकाऱ्यांनी येथील प्लांटबाबत माहिती घेत येथील प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) विनायक ठाकूर, ग्रामीण पाणी पूरवठा कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू, पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता नरेंद्र साळुंखे, तंत्र अधिकारी परीक्षित चितोडे, पुणे महानगरपालीकेचे कार्यकारी अभियंता रविंद्र मुळे,वेंगुर्ले गटविकास अधिकारी उमा पाटील,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संदेश परब,ग्रा.पा.पु.शाखा अभियंता प्रफुल्लकुमार शिंदे,जिल्हयातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, अभियंता, विस्तार अधिकारी, गट समन्वयक, समुह समन्वयक, संस्था प्रतिनिधी, पं. स.स्तरावरील कर्मचारी, गटसंचालन केंद्राचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
दरम्यान या कार्यशाळेत
दुसऱ्या दिवशी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता विभाग) विनायक ठाकूर यांनी जलजीवन मिशन ९० दिवस कार्यक्रम,जलजीवन मिशन अंमलबजावणी याबाबत तसेच स्वच्छ भारत मिशन १०० दिवस कार्यक्रम याबाबत मार्गदर्शन केले.मालवण गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी पाणी व स्वच्छता या बाबींवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मालवण कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी,आभार विनायक ठाकूर, यांनी मानले.वेंगुर्ले पं. स.गटविकास अधिकारी उमा पाटील यांनी कार्यशाळा व कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले.यावेळी वेंगुर्ले पंचायत समितीचे उत्तम सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page