मुंबई /-

शिवसेनेचे संतोष परब हल्‍लाप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे .न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांनी नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.तर नितेश राणेंसोबत अटकपूर्व जामीन अर्ज करणाऱ्या संदेश उर्फ गोट्या सावंत यांचीही याचिका फेटाळलीय.तर मनिष दळवींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय.शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश यांनी उच्च न्यायालयात धाव घेत अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.*

विधिमंडळाबाहेर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याने आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्याच्या हेतूने आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप नितेश राणे यांनी करताना आपल्याला खोटय़ा प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला होता. राज्य सरकारने राणे यांच्या अर्जाला जोरदार विरोध केला होता .विधानभवनाच्या पायऱ्यांवर घडलेल्या नाट्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्याचा दावा चुकीचा असून ही घटना त्याच्या काही दिवस आधी २१ डिसेंबरला घडली होती. ज्याच्या चौकशीसाठी आरोपींना नोटीस पाठवून त्यांची चौकशीही करण्यात आली.

जामीन अर्ज फेटाळण्याची राज्य सरकारची मागणी

तसेच हा गुन्हेगारी कट होता आणि पैसे कोणी दिले आणि त्यांनी मारेकऱ्यांना कामावर ठेवले आहे का? याची चौकशी करण्यासाठी आम्हाला आरोपींची कोठडीची गरजेची आहे. हा सगळा कट कणकवलीच्या आसपास घडला. मुख्य आरोपी हे स्वत: आमदार आहेत तसेच त्यांचे मोठ राजकीय प्रस्थ आहे.त्यांच्याविरोधात अनेक खटले दाखल आहेत. त्यामुळे त्यांना मोकळ सोडले तर तिथं त्यांची दहशत कमी होणार नाही,असे सांगत नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती . उभय पक्षांच्या युक्तिवादा नंतर न्यायमूर्ती भडंग यांनीराखून ठेवलेला निर्णय आज सोमवारी जाहीर करताना नितेश राणेंचा अर्ज फेटाळून लावत चांगलाच झटका दिला .

या प्रकरणातील सहआरोपी मनिष दळवी हे जिल्हा बँकेवर निवडून आलेले विद्यमान अध्यक्ष आहेत. दाखल गुन्ह्यात अटकेपासून त्यांना कोणतंही संरक्षण नसल्याने ते अडचणीत आले आहेत, असा अँड. मुंदरगी यांनी केला होता .तर मनीष दळवी घटनेच्या वेळीच त्या परिसरात दिसत होता.त्यामुळे चौकशी आवश्यक असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलले होते .याची दाखल घेत न्यायालयाने मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

जिल्हा बँक निवडणूक दरम्यान महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील 18 डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली असून आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोटय़ा सावंत या दोघांच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला झाल्याचा जबाब परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात नोंदवला.त्यानुसार आयपीसी कलम 34 (समान उद्देश साधण्यासाठी गुन्हेगारी कृती), 120 (ब)(गुन्हेगारी कट रचणे) आणि 307 (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. याप्रकरणी राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ज्येष्ठ वकील नितीन प्रधान यांच्या मार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती सी व्ही भडंग यांच्या समोर सुनावणी झाली. सुनावणीवेळी राज्य सरकारच्या वतीने विशेष वकील सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, राणें हेच कटाचे मुख्य सूत्रधार असून 28 ऑगस्ट रोजी व्हॅनिटी व्हॅनमध्ये राणेंच्या उपस्थितीत हल्ल्याचा कट रचला गेला. हल्ल्याच्या वेळी आमदार नितेश राणे हे स्वीय सहायक राकेश परब याच्या मोबाईलवरून आरोपी सचिन सातपुतेच्या सतत संपर्कात होते त्यांच्यात 65 वेळा बोलणं झाल्याचा सीडीआर रेकॉर्ड पोलिसांकडे आहे. तसेच राणेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्यावर यापूर्वी 5 केसेस दाखल आहेत तर संदेश उर्फ गोटया सावंत यांच्यावर 26 केसेस दाखल आहेत. या हल्ल्यासाठी पैसे देऊन बाहेरून गुंड मागवण्यात आले त्यांना किती पैसे देण्यात आले आणि कोणामार्फत हे पैसे दिले गेले त्यासाठी आमदार नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी होणे आवश्यक असल्याचे ऍड पासबोला यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page