देवगड /-

देवगड-जामसंडे येथे पार पडलेल्या पुरुष व महिला भव्य खुल्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत वेंगुर्लेतील नित्यानंद वेंगुर्लेकर व लक्ष्मण दळवी यांनी सुवर्णपदके पटकाविली.

देवगड-जामसंडे येथील वायंगणकर्स व्यायाम शाळेमार्फत ९ जानेवारी रोजी जामसंडे येथील कै.मो.ज.गोगटे सांस्कृतिक भवनांत आयोजित केलेल्या सबज्युनियर, ज्युनियर व सिनीयर या वयोगटांतील पुरूष व महिला वजनी गटाच्या (सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित) जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजक गणेश वायंगणकर व संजय साटम, कृषीसेवा केंद्र प्रमुख एकनाथ तेली, सिंधुदुर्ग जिल्हा पॉवरलिफ्टींग असोसिएशनचे सेक्रेटरी व कोच तथा आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर सुवर्णपदक विजेते दिलीप नार्वेकर, बागायतदार गणेश वाळके, अरविंद सीताराम वाळके, सचिन तेली, आनंद मोर्ये, शंकर नाणेरकर, प्रविण गुरव, मंगेश गवंडे, अमित कदम, वैभव मुद्राळे, मसुरकर, पंचायत समिती सदस्य मनस्वी घारे, व्यावसायिक महेश घारे यांचा समावेश होता. पुरुष व महिला भव्य ओपन स्पर्धेत स्पर्धेचे पॉवरलिफ्टींग स्पर्धा सब ज्युनियर व जुनियर सिनियर वजनी गट अनुक्रमे ५३, ५९, ६६, ७४, ८३, ८३ अशा वजनी गटांत पार पडल्या. या स्पर्धेस पुरुष ४१ व महिला १२ अशा ५३ पॉवरलिफ्टरचा या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जिम बॉडी टेम्पलचे नित्यानंद सुदेश वेंगुर्लेकर व सब ज्युनियर वजनी गटात सुवर्णपदक तर लक्ष्मण मोहन दळवी यांनी ज्युनियर वजनी गटात सुवर्णपदके पटकावली. ओम राजन पवार व पांडुरंग महादेव रांजणकर यांचा सिनियर वजनी गटात सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर सुवर्णपदक विजेते कोच दिलीप नार्वेकर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page