सावंतवाडी /-

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्विकृत सदस्यपदी सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथील श्री.दिवाकर राजाराम मावळणकर यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री. रमण वायंगणकर व सरचिटणीस विकास वैद्य यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.तसेच श्री.दिवाकर राजाराम मावळणकर यांना गोवा राज्याचा “स्टार फार्मर पुरस्कार ” मिळाल्याबद्दल त्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा महासंघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी महासंघाचे अध्यक्ष श्री.रमण रमण वायंगणकर ,सरचिटणीस विकास वैद्य ,महासंघाचे सदस्य दिलीप पेडणेकर ,उल्हास हळदणकर ईतर भंडारी समाज बांधव विकास केरकर, बाळा आकेरकर ,गुरुनाथ पेडणेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page