वेंगुर्ला /-


वेंगुर्ले साईदरबार हाॅल , सुंदरभाटले – वेंगुर्ले येथे भाजपाच्या वतीने मोफत ई – श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुमारे ३५० असंघटीत कामगार व लाभार्थी यांनी सहभाग घेतला.तसेच ६५ लाभार्थ्यांना ई – श्रम कार्ड चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता , पंडित दिनदयाळ उपाध्याय , डाॅ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतीमेस ज्येष्ठ नेते बाळा सावंत , वसंत तांडेल व माजी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली .
यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी मोदी सरकारच्या गेल्या ७ वर्षातील अंत्योदयाच्या योजनांची माहिती दिली. तसेच अंत्योदयाची कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने कशाप्रकारे सातत्याने प्रयत्न केले याची माहिती दिली.
तसेच अनेक योजना , ज्याप्रमाणे पंतप्रधान जनधन योजना, अटल पेन्शन योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजना, स्वामीत्व योजना, आत्मनिर्भर भारत योजना, स्थलांतरीत मजुरांसाठी श्रमशक्ती पोर्टल, स्फूर्ती, पंतप्रधान कौशल विकास योजना, ई – स्कील इंडिया, पंतप्रधान युवा योजना, पंतप्रधान उजाला योजना, पंतप्रधान सहज बिजली हर घर योजना ( सौभाग्य ), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान आयुष्यमान योजना, पंतप्रधान जनऔषधी योजना अशा विविध योजना देशातील गोर गरीब जनतेसाठी आणुन व त्यांचे जिवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले.यावेळी प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक नारायण सावंत यांच्या माध्यमातून मोफत ई – श्रम कार्ड कॅम्प चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.यावेळी वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , माजी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , महीला तालुकाध्यक्षा स्मिता दामले , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक – वसंत तांडेल व बाळा सावंत , माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे ,माजी नगरसेविका पुनम जाधव – कृपा मोंडकर – श्रेया मयेकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , परबवाडा सरपंच पपु परब , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे , ता .चिटनीस समीर चिंदरकर – समीर कुडाळकर , किसान मोर्चा जि.सरचिटणीस बाळु प्रभु , ता.का.का.सदस्य बिट्टु गावडे , महिला मोर्चा च्या रसीका मठकर – मानसी परब , बुथप्रमुख शेखर काणेकर – नितीश कुडतरकर – विनय गोरे – गुरुनाथ घाडी – वसंत परब – नारायण गावडे , युवा मोर्चा चे भुषण सारंग , ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते .सदर कार्यक्रमामध्ये शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page