कणकवली /-

कणकवली पटवर्धन चौकामध्ये आजपासून पुन्हा कोरोनाची आरटीपीसीआर व रॅपीड तपासणी केली जात आहे. शहरात गर्दी वाढू नये तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर चाप बसावा यासाठी कोरोना तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे.

पटवर्धन चौकातील या तपासणी ठिकाणी कणकवली मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला
यावेळी ज्यांना ज्यांना लक्षणे आढळतील त्यांची कोरोना तपासणी करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजीविक्रेते, फळ विक्रेते, व्यापारी व लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या करण्याच्या सूचना यावेळी मुख्याधिकारी तावडे यांनी दिल्या. आरोग्य कर्मचारी नीलम कांबळे, नगरपंचायत कर्मचारी सतीश कांबळे, विनोद सावंत, रमेश कदम व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page