कुडाळ /-

कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांना मुंबई येथील गौड ब्राह्मण सारस्वत सभा यांच्या तर्फे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक कामगिरी साठी दिला जाणारा “बा नी.देसाई आदर्श समाजसेवक पुरस्कार ” मुंबई येथे एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला.

ब्राह्मण सारस्वत सभा गिरगाव मुंबई यांचे१२४ वे वार्षिक स्नेहसंमेलन व शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष समारंभ दादर येथील शिवाजी विद्यासंकुल येथे नुकताच संपन्न झाला .सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर ,समर्थ डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन चे प्रमुख विकास वालावलकर ,प्रसिद्ध मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ माधव प्रभुखानोलकर ,भारतीय वायुसेनेतील माजी सैनिक सुधीर देसाई ,गौड ब्राह्मण सारस्वत सभेचे कार्यवाह मनीष दाभोळकर, देवदत्त खानोलकर, उमाकांत महाजन, जगदीश वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा समारंभ संपन्न झाला.

तळागाळातील सामान्य जनांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, त्याच बरोबर ग्रामीण भागामध्ये व्यावसायिक शिक्षणाच्या सुसंधी निर्माण कराव्यात यासाठी उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सन १८जानेवारी २००३ रोजी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेची स्थापना केली व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याच बरोबर समाजातील गरजू , गरीब विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात दिला. एवढेच नव्हे तर संपूर्ण जगा सहित भारताला भेडसावणाऱ्या कोरोना महामारी च्या काळात विलगीकरण कक्षात ठेवलेल्या लोकांना अन्न पुरवठा करणे ,त्यांचे मनोबल वाढविणे, रोजगाराची संधी गमावलेल्या गरीब लोकांना व दशावतार कलाकारांना, अन्नधान्यन वाटप करणे. याच बरोबर रुग्णालयांमध्ये शुश्रुषा करण्यासाठी नर्सिंग महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली नर्सेसना रुग्ण सेवेसाठी उद्युक्त करणे व बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर ची स्थापना करून लोकांचे प्राण वाचवले, त्यांना आरोग्य सुविधा ही लाखमोलाची कामगिरी पार पाडली. याची दखल घेऊन गौड ब्राह्मण सारस्वत सभा गिरगाव तर्फे त्यांना मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. याबद्दल सर्वच स्तरातून उमेश गाळवणकर यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page