सावंतवाडी /-

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व आझादिका अमृत महोत्सव अंतर्गत आज सावंतवाडी नगरपालिका, भिमगर्जना बौद्ध मंडळ, सावंतवाडी, ब्लू स्टार सपोर्ट क्लब आणि समाज मंदिर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज समाज मंदिर परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची स्वच्छता करून आजू बाजूच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व आझादिका अमृत महोत्सव अंतर्गत भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान व्यक्ती आणि स्वातंत्र्य सैनिक यांचा आदर करून, त्यांचे स्मरण कायम राहावे यासाठी ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या स्मारकांची स्वच्छता करण्यात यावी तसेच त्यांची देखभाल करण्यात यावी. या निकषानुसार सावंतवाडी नगरपालिका, भिमगर्जना बौद्ध मंडळ, सावंतवाडी, ब्लू स्टार सपोर्ट क्लब आणि समाज मंदिर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज समाज मंदिर परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची स्वच्छता करून आजू बाजूच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्री. नाटेकर, आरोग्य परिवेक्षिका रसिका नाडकर्णी, दीपक म्हापसेकर, शीतल वाळके, स्वप्ना नाईक, भिम गर्जना बौद्ध मंडळ अध्यक्ष मंगेश कदम, सचिव प्रविण कांबळी, ब्लू स्टार सपोर्ट क्लबचे अध्यक्ष प्रशांत पाटणकर, मोहन कांबळी, सुरेश कांबळी, किशोर जाधव, सुरेश कदम, शंकर आसोलकर, वासुदेव कदम, मोहन कांबळी, रामचंद्र आंबेरकर, विजय कोटेकर, नारायण जाधव, सुरेश खोब्रागडे, किरण कांबळी, सागर कोटेकर, चेतन आसोलकर, रुपेश जाधव, राजन नाईक, संतोष वाडकर, लतेश पवार, प्रदीप कांबळी, अमर कांबळी, सांगेलकर, रजनी शिंदे, लक्ष्मी जाधव, रेश्मा मेहत्तर, शुभांगी कांबळे, शोभा खोब्रागडे, ललिता कांबळे, ज्योती जाधव, मीनाक्षी पवार, नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, परिसरातील सर्व पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page