नवी दिल्‍ली /-

भारतात येत्या काही दिवसांतच कोरोना संसर्ग वाढीचा दर झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. हा कोरोना स्फोट काही काळासाठीच असेल. पण तो खूप वेगाने पसरू शकतो.अत्यंत वेगाने संक्रमित होणारा ओमायक्रॉन भारतासाठी चिंतेचे कारण बनू शकतो. कारण येथील लोकसंख्या सुमारे 140 कोटी एवढी आहे. कोविड-19 इंडिया ट्रॅकर विकसित करणारे केंब्रिज विद्यापीठाचे जज बिझनेस स्कूलचे प्रोफेसर पॉल कट्टूमन यांनी त्यांच्या ईमेलमध्ये ही भीती व्यक्त केली आहे.

पॉल कट्टूमन म्हणाले, भारतात कोरोनाचा स्फोट थोड्या काळासाठी असू शकतो. पण या काळात दैनंदिन प्रकरणांमध्ये अत्यंत झपाट्याने वाढ होईल. याशिवाय, प्रोफेसर पॉल कट्टूमन आणि त्यांच्या टीमने म्हटले आहे, की या आठवड्यापासून नवीन संसर्गाची प्रकरणे वाढू लागतील. मात्र, रोज किती रुग्ण समोर येऊ शकतात हे सांगणे कठीण आहे. तसेच, प्रोफेसर पॉल आणि त्यांच्या टीमने तयार केलेल्या कोविड-19 इंडिया ट्रॅकरने देशातील सहा राज्यांसाठी विशेष चिंता व्यक्त केली आहे.

*कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता *

यात सांगण्यात आले आहे, की 24 डिसेंबरपर्यंत नव्या रुग्ण संख्येत 5 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, तर 26 डिसेंबरपर्यंत भारतातील 11 राज्यांमध्ये संसर्ग पसरू शकतो. यानंतर कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढू शकते. विशेष म्हणजे, भारतात आतापर्यंत 480290 लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून लाखो लोकांना याची लागण झाली आहे.देशात, अनेक राज्यांतील लोकांनाही कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झाली आहे. सध्या देशात 653 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. मात्र हा व्हेरिअंट वेगाने पसरत असल्याने देशात सावधगिरी बाळगली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page