कणकवली /-

कणकवली तालुक्यातील असलदे डामरेवाडी येथील श्री. सोमवती देवी सेवा मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे दत्तजयंती निमित्त साईपादुकांची पालखी मिरवणूक व ११ वा वर्धापन दिन सोहळा, सत्यनारायण महापूजा उत्सव १७ व १८ डिसेंबर २०२१ रोजी उत्साहात पार पडला. यावर्षी साई पालखी सोहळा कोरोनाचे नियम पाळून पार पडला व यंदा साईपालखी मिरवणूक असलदे ते श्री स्वामी समर्थ मठ, हडपिड अशी काढण्यात आली. साई दर्शनासाठी चाकरमान्यांनी कोकणात साईदर्शनाला हजेरी लावली होती. नवसाला पावणाऱ्या साई बाबा चरणी असंख्य भक्तांना रांगा लावल्या होत्या.

सत्यनारायणाची महापूजा, साईंची महाआरती व महाभंडारा, महिलांसाठी हळदी – कुंकू कार्यक्रम, “लहान व मोठ्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, साईबाबांच्या पालखीची मिरवणूक, फुगडीचा कार्यक्रम देवगड मिठमुंबरी, श्री गणेश दशावतार नाट्य मंडळ, कडावल, ता. कुडाळ यांचे तुफान विनोदी नाट्य प्रयोग सत्व परिक्षा सादर करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.

कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे मंडळाचे कार्याध्यक्ष विजु ना. डामरे, अध्यक्ष सुरेश डामरे, खजिनदार विजय डामरे, युवा मंडळ प्रथमेश डामरे, कल्पेश डामरे, रोहन डामरे, मनिष डामरे, युवराज डामरे, स्वप्नील डामरे, राजन मालवणकर, ओमकार डामरे, एस. एम. डामरे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page