कुडाळ /-

कुडाळ आरएसएन हॉटेल समोरिल महामार्गावर धोकादायक असलेल्या सर्कलच्या ठिकाणी सर्कल ऐवजी या ठिकाणी उड्डाण पुल बांधा, व हे पुल पुर्ण होईपर्यंत तात्पुरत्या उपाय योजना करा अशा मागण्या यावेळी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत कुडाळातील सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरीकानी केली. तसेच येत्या 10 दिवसात या ठिकाणी उपाय योजना न केल्यास राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

येथील महामार्ग सर्कलच्या ठिकाणी वांरवार अपघात होत काहीजण मृत्युमुखी पडले, अनेकजण गंभीर जखमी झाले असुन मंगळवारी सांयकांळी याच ठिकाणी मोटारसायकल व कार यांच्यात झालेल्या अपघातात पाट येथील भुषण देसाई या युवकाचा मृत्यू झाला होता. या नंतर संतप्त झालेल्या कुडाळ वासीयांनी महामार्गावर महामार्ग रो आंदोलन केले त्यामुळे दोन्हीही बाजुने महामार्ग ठप्प झाला. त ठिकाणी पोलिसांनी जात येथील सर्कल बाबत निर्णय घेण्याकर प्रांताधिकारी तहसीलदार व महामार्ग अधिकारी यांच्या उपस्थितीत

बुधवारी 5 वाजता तहसिल कार्यालय येथे बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्याने हे हे आंदोलन मागे घेतले होते.बुधवारी सांय. 5 वाजता या बैठकीचे आयोजन प्रांताधिकारी वंदना खरमाळे व तहसीलदार अमोल पाठक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी पोलिस नायब तहसीलदार पवार,पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, महामार्गाचे अधिकारी राजकीय अभय शिरसाट, काका कुडाळकर, धीरज परब, संजय पडते, संजय भोगटे, श्रीराम शिरसाट, प्रसाद शिरसाट, सुनील भोगटे, राजन नाईक, निलेश तेंडुलकर, विजय प्रभु, गजानन कांदळगावकर, अविनाश पराडकर, रोहन देसाई, राजन बोभाटे, संजय बांदेकर तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी अभय शिरसाट यांनी सांगितले की, अनेक आंदोलने झाली, अनेक अपघात झाले, मात्र प्रशासनाने आंदोलन कर्त्यावर व नागरीकांवर कारवाई केली. सध्यातरी या सर्कलच्या ठिकाणी रबर प्लँट लावावे, सर्व्हिस रोडचे येथील मार्ग बंद करावा, सर्व वाहतुक हॉटेल राज समोरील बॉक्सवेल मधुन वळवावी, आवश्यक ते सुचना फलक लावावेत अशा मागण्या सर्वानुमते केल्या.

यावेळी धीरज परब यांनी सांगितले की, अनेक आंदोलने झाली आपल्या कार्यालयासमोर मात्र काहीच कार्यवाही झाली नाही. ठेकेदारा कडुन पोलिस बळाचा वापर करून आंदोलन दाबले जाते. आता आंदोलक व पोलिस असा संघर्ष होवु शकतो.

यावेळी काका कुडाळकर यांनी सुरक्षिततेच्या बाबत आपली जबाबदारी आहे का? संबंधित चुकणार्यावर कारवाई करण्याची अधिकार आहे की नाही ते सांगा असे प्रश्न महामार्ग पोलिस अधिकार्यानां विचारून धारेवर धरले. यावेळी महामार्ग अधिकारी यांनी सांगितले की, आम्ही आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत, मात्र कारवाईचा अधिकार आम्हाला नाही. यावेळी प्रसाद शिरसाट व अविनाश पराडकर यांनी या ठिकाणी उड्डाण पुलच करावे अशी मागणी केली. तसेच इतर उपस्थितांनी महामा काम निकृष्ठ व बोगस केले आहे. असे असताना प्रशासनाने ह ताब्यात का घेतला असा ही प्रश्न उपस्थित केला. यावेळी ठेकेदार कंपनीच्या अधिकार्याने सांगितले की काही ठिकाणी

मध्यभागी असलेले डिव्हायडर बंद करण्यास गेल्या नंतर कामगारांना मारहाण करण्यात आली काम कसे करायचे? असे सांगताच सर्वजण संतप्त झाल्याने वातावरण काहीकाळ तंग झाले होते.

सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा- अभय शिरसाट या ठिकाणी अपघात होतात तरीही काहीही उपाय योजना केल्या नाहीत त्यामुळे महामार्ग प्रशासनाचे अधिकारी व ठेकेदार कंपनीवर येत्या 10 दिवसात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा अभय शिरसाट यांनी दिला.

यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी सांगितले की, सदर मार्गावर गतिरोधक घालण्यात यावे अशा मागणीचे पोलिस प्रशासनाने पत्र द्यावे, तो पर्यंत दोन्हीही बाजुने 500 मीटरवर रबर स्ट्रीप व आवश्यक सुचना फलक लावणेत यावेत. तसेच जास्तीत जास्त वाहतुक ही राज हॉटेल समोरील बॉक्सवेल मधुन वळवावी अशा सूचना संबंधित अधिकार्यानां केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page