वेंगुर्ला /-

आगामी जिल्हा बॅक निवडणुक तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकाविण्याचा निर्धार वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या मासिक सभेत करण्यात आला.
वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक सभा शिवसेनेच्या  तालुका संपर्क कार्यालयात शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी शहर प्रमुख अजित राऊळ, उपतालुका प्रमुख उमेश नाईक, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, सुधाकर राणे, योगेश तेली, गजानन गोलतकर, संजय परब, सावली आडारकर, संतोष कुडव, समृध्दी कुडव, सुहास मेस्त्री, अभि मांजरेकर, उदय गोवेकर, दादा सारंग, मेरी फर्नांडिस, दिलिप राणे आदी उपस्थित होते.यावेळी लष्करप्रमुख बिपीन रावत यांना श्रद्धांजली  वाहण्यात आली. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा व्यक्त करुन खाऊ वाटप करण्यात आले.जिल्हा बॅक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी व जिल्हा बॅक अध्यक्ष सतिश सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याचे ठरले. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या वेंगुर्ले तालुक्यातील विविध विकास कामांची भुमिपूजने आचार संहिता संपल्यानंतर करण्याचे ठरले. तसेच अत्यावश्यक असलेली पण मंजूर नसलेली तालुक्यातील विकास कामे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, व आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून करण्याचे ठरले. वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना पक्षसंघटना मजबूत करण्यासंदर्भात यावेळी  यशवंत परब, सुकन्या नरसुले,अजित राऊळ यांनी मार्गदर्शन केले. पंकज शिरसाट यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page