कुडाळ /-


कुडाळ तालुक्यातील केरवडे येथील श्री देव जगन्नाथ मंदिराचा पुनः प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा २१ ते २६ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.यानिमीत्त मंदिरात भरगच्च अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ७ देवस्थान भेट कार्यक्रम, सायंकाळी ७ ते ८ जिवन विद्या मिशन कुडाळ यांचा हरिपाठ कार्यक्रम, रात्री ८ ते ११.३० हभप नवनाथ बोराडे यांची किर्तन, बुधवार दि. २२ डिसेंबर रोजी सायं ०४ वा. मूर्ती व शिखर कलश यांचा मिरणूकीसह धान्याधिवास,सायं ०७ ते ८.३० वा. संगीत रजनी-अॅड. दिलिप ठाकूर ,रात्रौ ०८.०० ते १०.०० वा.महाप्रसाद , रात्रौ ०८.३० ते ११.३० वा.,स्थानिक मुलांचा विविध गुणदर्शन सोहळा गुरुवार दि. २३ डिसेंबर सकाळी ०९.०० ते १२.०० वा. प्रायश्चित विधान, सुवासिनी स्त्रीयांसह गंगापूजन, देव जलाधिवास, दुपारी ०१ ते ३.०० वा. महाप्रसाद , सायं ०७.०० ते ०९.०० वा.खेळ पैठणीचा बादल चौधरी यांचे सादरीकरण ,रात्रौ ०९.०० ते १२.३० वा. पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग,
शुक्रवार दि. २४ डिसेंबर सकाळी ०८.०० ते ०१.०० वा.शांतीपाठ, गणेश पुजन, पुण्याहवाचन, नांदीश्रध्द, वर्धिनीपूजन, संभारदान, परिसर शुध्दी, गणहोम, शांतीहोम, जलाधिवास, प्रासाद वास्तुदेवता स्थापना, ब्रम्हांदिमंडल, देवता स्थापना स्थाप्य देवतांची मिरवूकीसह शय्येवर स्थापना, तीर्थप्रसाद, दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. महाप्रसाद ,सायं ०५.०० ते ०६.०० वा. स्तोत्र पाठ (पुरोहीत वृंद), सायं ०६.३० ते ०८.०० वा., किर्तन – ह.भ.प. कु. ऋचा पिळणकर ,रात्रौ ०९.०० ते ११.०० वा.कथ्थक व पखवाज जुगलबंदी- महेश सावंत ग्रुप ,शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ०८.०० ते ०१.०० वा. शांतीपाठ मंडल देवतांची पुजा, अग्निस्थापना, ग्रहस्थापना, वास्तुवजन प्रयजन, प्रधान होम तत्व होम, तुलसी त्रिपुर दिप, शिखर ११.३५ च्या मुहूर्तावर शिखर प्रतिष्ठापना तीर्थप्रसाद,दुपारी ०१.०० ते ०३.०० वा.महाप्रसाद,
सायं ०५.०० ते ०७.०० वा. मूर्तीची सवाद्य मिरवणुक- मंदिर प्रदक्षिणा, सायं ०७.०० ते ०८.०० वा. संगीत रजनी,रात्रौ ०८.०० ते ०९.३० वा. अरुण परब यांचे मनोगत, रात्रौ ०९.३० ते १२.३० वा. धमाल विनोदी नाटक , रविवार दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ०८.०० ते १२.३० वा. शांतीपाठ, पीठस्थ देवता पुजन, अग्न्यर्चन, सकाळी १०.२५ वा च्या शुभमुहूर्तावर मुर्तीची पुनः प्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा, देवता महापुजा, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक,ब्राम्हणपूजन, श्रेयदान, महानैवेद्य , महाआरती, सामुदाईक गाऱ्हाणे, कर्म सांगता, देवदर्शन, तीर्थप्रसाद,दुपारी ०१.०० ते ०४.०० वा. महाप्रसाद,सायं ०५.३० ते ०७.०० वा. दिपोत्सव,रात्रौ ०७.३० ते १२.३० वा. ऑर्केस्ट्रा-झंकार कोल्हापूर,सोमवार दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वा. पासून ओटी भरणे, १०.३० ते १२ घरगणिक कल्पवृक्ष वाटप आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page