वेंगुर्ला / –

वेंगुर्ले नगरपरिषद दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले नगरपरिषद स्वामी विवेकानंद सभागृह येथे महिला मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते झाले.यावेळी स्त्रीभ्रूणहत्या व स्त्री जन्माचे स्वागत या विषयावर डॉ. राजेश्वर उबाळे यांनी, कायदे विषयक बाबी यावर ऍड. सुषमा प्रभुखानोलकर यांनी आणि स्त्री आणि सामाजिक जाणीव सद्यकालीन परिस्थिती याबाबत सीमा मराठे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, डॉ. राजेश्वर उबाळे, ऍड. सुषमा प्रभुखानोलकर,साप्ताहिक किरात च्या संपादिका सीमा मराठे, माविम चे जिल्हा समन्वयक नितीन काळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुम्बरे, स्वाती मांजरेकर, मनाली परब ,अतुल अडसूळ आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती मांजरेकर व आभार अतुल अडसूळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page