कणकवली /-

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कणकवली चौंडेश्वरी मंदिर येथील सभागृहात मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथून शरद पवार यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सकाळी ११ वा. ऑनलाईन मार्गदर्शन केलं.हे प्रक्षेपण कणकवली शहर व तालुका राष्ट्रवादी तर्फे कणकवली शहरातील चौडेश्वरी मंगल कार्यालय येथे लाईव्ह दाखवण्यात आले. शरद पवार यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी शरद पवार प्रेमी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हा कार्यक्रम राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबीद नाईक व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर यांनी आयोजित केला होता.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला निरीक्षक स्नेहल मठपती, • राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, महिला प्रदेश सरचिटणीस नम्रता कुबल, कणकवली राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजूं पारकर , राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सत्यवान साटेलकर, वेंगुर्ला महिला तालुका अध्यक्ष दीपिका राणे, माजी वेंगुर्ला उपनगराध्यक्ष वामन कांबळे, आर. के. सावंत, कणकवली व्यापारी अध्यक्ष दादा बेलवलकर, दादा कुडतरकर, वकील उमेश सावंत, जगन्नाथ वळंजू, अणावकर गुरुजी, डॉ. अभिनंदन मालंडकर, रिया भाभुरे, श्रद्धा गावकर, हुमेर नाईक, नीलम वर्णने, स्नेहल पताडे, सुधाकर कर्ले, विलास गावकर, असिफ नाईक, किशोर केळुस्कर, गणेश चौगुले, अमित केतकर, इम्रान शेख, अनिस नाईक, संदीप राणे, दिलीप वर्णने, सचिन सडदेकर, सतीश पताडे, विशाल पेडणेकर, विशाल ठाणेकर, दीपेश सावंत सागर पवार, बाळू मेस्त्री, सहीद काझी व अन्य उपस्थित होते.

यावेळी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व उपस्थितीत • राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केक कापत आनंदोत्सव साजरा केला. तसेच कणकवली गणपती साना येथे पाणी अडवण्यासाठी जानवली नदिवर कच्चा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे कणकवली ते जाणवली यांना येण्या-जाण्यासाठी सोयिस्कर रस्ता उपलब्ध होऊन कणकवली शहरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page