सिंधुदुर्ग /-

1नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या व दहा वर्षापेक्षा कमी सेवा असणाऱ्या दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या कायदेशीर वारसांना तात्काळ मिळणार 10 लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदान

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील जे प्राथमिक शिक्षक 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागले होते व त्यांचा दहा वर्षे सेवेच्या आत दुर्दैवी मृत्यू झालेला असेल तर त्यांच्या कायदेशीर वारसाला दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

1नोव्हेंबर2005 नंतर सेवेत लागलेल्या जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना दुर्दैवाने मृत्युमुखी पडल्या नंतर त्याच्या कायदेशीर वारसांना लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे राज्य शासनाने दि 28 सप्टेंबर2018 च्या शासन निर्णयाने मान्यता दिली होती ,मात्र गेल्या तीन वर्षांमध्ये राज्यात जिल्हा परिषदे अंतर्गत एका ही प्राथमिक शिक्षकाला 10लक्ष सानुग्रह अनुदान मिळालेले नव्हते, या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष श्री राजेश सुर्वे सर व सर्व राज्यकार्यकारिणी पदाधिकारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री महोदय नामदार मान श्री उद्धवजी ठाकरे साहेब,उपमुख्यमंत्री नामदार मान श्री अजितदादा पवार साहेब,ग्रामविकास मंत्री नामदार मान श्री हसनजी मुश्रीफ साहेब, शालेय शिक्षण मंत्री नामदार मान श्रीम वर्षाताई गायकवाड मॅडम राज्याचे विरोधी पक्षनेते मान श्री प्रवीणभाऊ दरेकर साहेब,शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार मान श्री संजयजी केळकर साहेब,आमदार मा डॉ रणजीत पाटील साहेब,आमदार मान डॉ सुधीर तांबे साहेब यांच्या मार्फत मान श्री विशाल सोळंकी साहेब शालेय शिक्षण आयुक्त साहेब पुणे, राज्याचे शिक्षण संचालक मान श्री जगताप साहेब,शिक्षण संचालक मान श्री दिनकर टेमकर साहेब यांच्याकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता.

संघटने कडून या विषय संदर्भाने शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आलेला होता, त्यानंतर या प्रकरणाला गती मिळाल्यानंतर मान शिक्षण आयुक्त साहेब व मान शिक्षण संचालक साहेब यांनी उपोषण करण्यात येऊ नये असे लेखी पत्र शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष श्री राजेश सुर्वे यांना दिले होते, शिक्षक परिषद चे राज्याध्यक्ष श्री राजेश सुर्वे यांनी त्या निवेदना आधारे राज्याचे मान. मुख्यमंत्री मान श्री उद्धवजी ठाकरे साहेब,राज्याचे उपमुख्यमंत्री मान श्री अजितदादा पवार साहेब व इतर मान्यवरांना या विषयी पुन्हा सातत्यपूर्ण पत्रव्यवहार केला होता ,गेल्या सोमवारी 6डिसेंबर2021 रोजी पुन्हा एकदा पुणे येथे मान शिक्षण आयुक्त यांच्या समवेत झालेल्या बैठकीत या विषयी सकारात्मक निर्णय झाल्यानंतर मान शिक्षण आयुक्तांनी तातडीने मंत्रालयामध्ये शालेय शिक्षण विभाग उपसचिव मान श्री सावंत साहेब यांच्याशी चर्चा केली होती.

10 लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदान अदा करण्या बाबतच्या विषया मध्ये जे काही अडथळे आज पर्यंत होते, त्यात हे अनुदान ग्रामविकास विभागाने पारित करून अदा करावे की शालेय शिक्षण विभागाने अदा करावे हा प्रश्न निर्माण झालेला होता ,आज हा मोठा प्रश्न शिक्षक परिषदेच्या सातत्य पूर्ण प्रयत्ना मुळे निकाली निघून सर्व प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तात्काळ अदा करावेत या पद्धतीचे आदेश पारित झालेले आहेत. त्यामुळे राज्यातील ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांच्या कायदेशीर वारसांना दहा लक्ष रुपये सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आज अभूतपूर्व असे यश प्राप्त झालेले आहे , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व अधिकारी व सर्व पदाधिकारी यांचे मनः पूर्वक हार्दिक आभार मानण्यात येत आहे.राज्यभरातील प्राथमिक शिक्षकां कडून या निर्णयाचे स्वागत होत आहे असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रका नुसार सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page