वेंगुर्ला /-


मठ कुडाळतिठा ते गवळदेव मंदिर कुडाळ पर्यंतच्या राज्य मार्गाची अतिशय दुर्दशा झाली असून याबाबत “जनतेच्या हिताच्या दृष्टीने” पुढील दिशा ठरविण्यासाठी वाडीवरवडे येथील हरिओम मंगल कार्यालय येथे सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली.यावेळी सोमवारी कार्यकारी अभियंता सा. बां.सावंतवाडी यांना घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी ५ महत्वाचे ठराव घेण्यात आले आहेत.यामध्ये सोमवारी सा. बां.
कार्यकारी अभियंता सावंतवाडी यांना घेराव घालून जाब विचारण्यात येणार आहे.पुढील ४ दिवसात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, खासदार, पालकमंत्री, तिन्ही आमदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.गरज पडल्यास वेंगुर्ले कुडाळ सीमारेषेवर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या घरातील सर्व कुटुंबातील व्यक्ती व मुलाबाळांसहित १ किमी लांबीचा रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्राम सभा घेऊन निषेधाचा ठराव सर्वानुमते संमत करून त्याची प्रत राज्यपाल यांना पाठविण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग, कुडाळ – सावंतवाडी यांच्या निष्काळजीपणामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत सुधारणा न झाल्यास हायकोर्ट मध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे, आदी ठराव यावेळी घेण्यात आले.मठ कुडाळतिठा ते गवळदेव मंदिर कुडाळ पर्यंतच्या राज्य मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून वेंगुर्ले शहर, मठ, आडेली, वेतोरे, पालकरवाडी, वाडीवरवडे, पिंगुळी व कुडाळ शहरामधील तसेच अन्य भागातील सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत आहे.सदर रस्त्याची ठिकठिकाणी झालेली दुर्दशा, चाळण, वाताहत व गंभीर परिस्थिती पाहता प्रत्येक नागरिक मठ ते पिंगुळी या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहतूक प्रवास करताना जीव मुठीत धरून ये-जा करीत आहेत.याबाबत वाडीवरवडे येथे बैठक घेऊन महत्वाचे ५ ठराव घेण्यात आले. यावेळी आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग चे सचिव नंदन वेंगुर्लेकर, वाडीवरवडे सरपंच अमेय धुरी,मठ सरपंच तुळशीदास ठाकूर, पालकरवाडी सरपंच संदिप चिचकर, आडेली सरपंचा प्राजक्ता मुंडये, वेतोरे सरपंचा राधिका गावडे, पिंगुळी उपसरपंच सागर रणसिंग, वाडीवरवडे उपसरपंच ममता धुरी, दिलीप प्रभुखानोलकर, समिर गोसावी, समिर झोरे, सदाशिव पाटील, स्वप्निल चमणकर, ऍड.अनघा तेंडोलकर, तुळशीदास पिंगुळकर, राजेंद्र सडवेलकर,प्रदीप भाटिया, रंजना मेस्त्री,संतोष तुळसकर, निरंजन रावराणे, रमेश मेस्त्री, मिलिंद खानोलकर, बबन परब, सूर्यकांत गाड, कुडाळ सार्वजनिक बांधकाम चे पी. डी. पाटील, ए. आर. बिऱ्हाडे आदींसह वेतोरे, पालकरवाडी वेतोरे, मठ, पिंगुळी, वाडीवरवडे भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page