कणकवली /-

कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावाला मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमधून सन २०१७-१८ साली मंजूर झालेली खारेपाटण संभाजी नगर टाकेवाडी नवीन नळपाणी पुरवठा योजनेचे काम नुकतेच पूर्ण झाले असुन खारेपाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या नवीन नळपाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा तथा शुभारंभ कार्यक्रम उद्या गुरुवार दि. २ डिसेंबर, २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जि. सी. वेंगुर्लेकर यांनी दिली. या कार्यक्रमाला खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत व उपसरपंच इस्माईल मुकादम यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच खारेपाटण गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.

खारेपाटण गावाला पाणी पुरवठा करणारी सध्याची नळपाणी पुरवठा ही फार जुनी झाली असून गावाची वाढती लोमसंख्या विचारत घेता पाणी पुरवठा करताना खारेपाटण ग्रामपंचायतील खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र सन २०१७-१८ साली महाराष्ट्र् शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून तत्कालिन उपसरपंच संदेश धुमाळे यांच्या कारकिर्दीत ही नळयोजना मंजूर झाली होती. सुमारे ५८ लाख रुपये खर्च करून बनविण्यात आलेल्या या नवीन नळपाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदाराच्या बेपर्वाईमुळे मागील दोन वर्षात पूर्णतः ठप्प झाले होते. मात्र खारेपाटण गावचे विद्यमान सरपंच रमाकांत राऊत यांनी सदर रखडलेल्या नळयोजनेचा पाठपुरावा करून अखेर ही योजना पुर्णत्वास नेली. साधारणत: सुमारे दीड लाख लिटर पाण्याची क्षमता असलेली मोठी पाणी पुरवठा संचय पाण्याची टाकी खारेपाटण येथील प्रसिद्ध सजराबाई डोंगरावर बांधण्यात आली असुन या नवीन नळपाणी पुरवठा योजनेचा लाभ येथील सुमारे ६००० पेक्षा अधिक नागरिकांना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page