देवगड /-

देवगड आनंदवाडी येथील रहिवासी शिवाजी सुभाष कुबल यांच्या घराला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री 8 च्या सुमारास घरातील सर्व मच्छीमारी व्यवसायासाठी घरातून बाहेर असताना हे विपरीत घडले. ही आग विझवण्यात ग्रामस्थांना यश मिळाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून पुढील तपास अजून चालू आहे. फ्रिज, टीव्ही सारखे सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा चिथडा झाला, घरामध्ये असलेले दोन गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला मात्र संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page