कणकवली /-

महाराष्ट्र् राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने नुकत्याच राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या सहकारी संस्थेच्या नामनिर्देशन पत्र भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर, २०२१ रोजी संस्थेच्या एकूण १३ जागांसाठी तब्बल ३० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे खारेपाटण सोसायटीची यंदाची निवडणूक ही चुररशीची होणार आहे.

खारेपाटण सोसायटीच्या सन २०२१ – २२ ते २०२६ – २७ या कालावधी करिता होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटातून विजय जयराम देसाई, संतोष परशुराम सरफरे, इस्माईल अ कादिर मुकादम, अशोक भिकाजी पाटील, एकनाथ राजाराम कोकाटे, सुरेंद्र काशीनाथ कोरगावकर, मंगेश दत्ताराम गुरव, प्रताप राजाराम फाटक, सुरेश नारायण पाटणकर, शमशुद्दीन अ लतीफ काझी, मधुकर विष्णू पाटणकर, धोंडू रावजी घेवडे, प्रदीप शांताराम मोहिरे, अनंत जानू जेधे, महेश शंकर राऊत, सत्यविजय सदाशिव भालेकर आदी १८ उमेदवारांनी ८ जगासाठी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

तर महिला राखीव गटातून तृप्ती किशोर माळवदे, उज्वला वीरेंद्र चिके, गीता गजानन आडविलकर, प्रिया प्रदीप निग्रे आदी ४ महिला उमेदवारांनी २ जागासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तसेच इतर मागास प्रवर्गातून मंगेश विश्राम गुरव, दयानंद दिनकर कुडतरकर, प्रकाश शांताराम मोहिरे आदी ३ उमेदवारांनी एका जागेसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून मोहन सखाराम पगारे, संतोष यशवंत पाटणकर, प्रकाश बबन कांबळी आदी ३ उमेदवारांनी १ जागेसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत व भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रवर्गातून १ जागेकरिता रघुनाथ महादेव राणे व मनोहर सखाराम गोसावी या २ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

खारेपाटण सोसायटीच्या यंदाच्या होणाऱ्या निवडणुकीत विद्यमान जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच संस्थेच्या आजी-माजी सदस्य यांसह जेष्ठ कार्यकर्ते व नवोदित कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून उमेदवाराच्या नामनिर्देश पत्राची छाननी दि. २९ नोव्हेंबर, २०२१ रोजी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दि. ३० नोव्हेंबर, २०२१ ते दि.१४ डिसेंबर, २०२१ या कालावधी नंतर प्रत्यक्ष निवडणुकीत किती उमेदवाराचे अर्ज शिल्लक राहतील यावर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या तरी खारेपाटण सोसायटीची निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत नाही. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यतील सर्वांचेच लक्ष खारेपाटण सोसायटीच्या दि. २८ डिसेंबर, २०२१ रोजी होणाऱ्या निवडणुकीकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page