वैभववाडी /-
वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे आज दि. २६ नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक नादकर बी. एस., शिंदे एस. बी. यांच्यासह प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.