वेंगुर्ला /-


त्रिपूरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधुस झाल्याची क्लिप व्हायरल करुन महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरुन दुकाने, कार्यालये, गाडया यांचा विध्वंस केला गेला. त्याचा निषेध म्हणून वेंगुर्ले तालुका हिंदुत्ववादी संघटनेतर्फे सोमवारी लक्षवेधी आंदोलन करीत वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे यांना निवेदन सादर करण्यात आले.
संबंधित निषेध करण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदुत्ववादी संघटना व राष्ट्रप्रेमी जनता सामील झाली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद,हिंदु जनजागृती समिती,सनातन तसेच भाजपा या हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तहसिलदार वेंगुर्ले यांना निवेदन देण्यात आले.यावेळी वेंगुर्ले तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती, व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्य न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत करा, हि दंगल घडविणाऱ्या सूत्रधाराना व त्यांच्या समर्थकांना अटक करा, दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घाला, स्वसंरक्षणासाठी उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी, हिदुत्ववादी संघटनेचे नेते, कार्यकर्त्यावरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबविण्यात यावी, त्याच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत आदी मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना सादर करण्यात आले.
यावेळी भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण ,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,जिल्हा चिटनीस निलेश सामंत, रा.स्व.संघाचे कार्यवाह मंदार बागलकर,अमीत नाईक, बाबुराव खवणेकर,गुरुप्रसाद खानोलकर,विश्व हिंदु परिषदेचे अरुण गोगटे व गिरीष फाटक, आपा धोंड,आशिष पाडगावकर,विजय मोरजकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर,नगरसेवक धर्मराज कांबळी,नगरसेविका श्रेया मयेकर,सनातनचे प्रताप गावसकर,ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , किसान मोर्चा जि. सरचिटणीस बाळु प्रभु , ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर, युवा मोर्चा चे निलय नाईक, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाट, सांस्कृतिक आघाडी चे शैलेश जामदार, रा.स्व. संघाचे वैभव होडावडेकर – सौरभ नागोळकर – महादेव मराठे – सुनील प्रभुखानोलकर – सागर रेडकर – सदानंद रेडकर , महीला मोर्चा च्या रसीका मठकर – आकांक्षा परब, अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख , आनंद ( बिटु ) गावडे, शेखर काणेकर, अरुण ठाकुर , शशिकांत करंगुटकर, संदीप पाटील, अजित नाईक, ओंकार चव्हाण, प्रकाश रेगे, विजय ठाकुर, जगन्नाथ राणे, सोमकांत सावंत,अनिल गावडे, दयानंद कृष्णाजी, राहुल परब, दिलीप मुळीक आदी हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page