कुडाळ /-

कणकवली तालुक्यातील कोळोशी निशान टेंभ मार्ग येथे जंगलात रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासात बिबड्या अडकला होता. उपवनसंरक्षक नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या बिबट्याची फासकीतून सहीसलामत सुटका केली आणि बिबट्याला पिंजऱ्यात बंद करून कणकवली फॉरेस्ट रेंजर कार्यालयात आणले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोसावी यांनी त्या बिबट्याची तपासणी केली. बिबट्याची प्रकृती उत्तम असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासणीनंतर त्या बिबट्याला वनक्षेत्रात सुरक्षित सोडून देण्यात येणार आहे. सादर बिबट्या हा 2 वर्षांचा असून वनविभागाच्या दक्षतेमुळे बिबट्याला जीवदान मिळाले. दुर्दैवाने या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाला असता तर त्याला जबाबदार कोण ? हा प्रश्न उपवनसंरक्षक नारनवर यांना विचारला असता त्यांनी फासकी लावणाऱ्या त्या अज्ञाताविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असून फासकी लावणाऱ्याचा शोध घेत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज शी बोलताना सांगितले. कोळोशी गावात शिकारीच्या उद्देशाने फासकी लावणाऱ्या त्या अज्ञाताविरोधात रीतसर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे तात्काळ आदेशही डीएफओ नारनवर यांनी वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांना दिले.

सिंधुदुर्ग /-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page