वेंगुर्ला /-


आमदार दिपक केसरकर यांनी आज शनिवारी वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.दरम्यान त्यांनी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना भेटून तौक्ते वादळाच्या निकषाप्रमाणे लवकरात लवकर मदत व जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले.

      १६ नोव्हेंबर रोजी मठ गावात चक्रीवादळ झाल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे नुकसान झाले.यामध्ये सुमारे घरे, मांगर व अंगणवाडी इमारत यांचे नुकसान झाले.तसेच शेतकऱ्यांचे आंबा,काजू कलमे यांचेही नुकसान झाले आहे.याबाबत आज आमदार दिपक केसरकर यांनी मठ गावठणवाडी, सतयेवाडी,मठकरवाडी,बोवलेकरवाडी आदी ठिकाणी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.यावेळी झालेल्या नुकसानीची संबंधित विभाग अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.येथील नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.तसेच कृषी नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करुन वरिष्ठ स्तरावर सादर करण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे,वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे,शिवसेना उपतालुकाप्रमुख उमेश नाईक,मठ उपसरपंच निलेश नाईक,मंडळ अधिकारी, कृषी सहाययक पालव,तलाठी गवते,कोतवाल सुरेश मठकर,अरविंद बागायतकर,प्रकाश गडेकर, सुहास तेंडोलकर,चंद्रकांत ठाकूर,नित्यानंद शेणई,नितीन मांजरेकर, आना बोवलेकर, दिगंबर बोवलेकर, सुनिल बोवलेकर, प्रकाश धुरी,प्रसन्ना शेणई,महादेव काजरेकर,तुषार आईर,संतोष तळवडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page