सिंधुदुर्गनगरी /-

नेरूर घाडीवाडा येथे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता मिळावा या प्रमुख मागणीसाठी नेरुर घाडीवाडा येथील ग्रामस्थानी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.तर जोर जोरात घोषण देत प्रशासनाचे लक्ष वेधले.कुडाळ तालुक्यातील ननेरूर समतानगर या रस्त्यांची निर्मिती करण्यासाठी १९९५ साली सहकार्य करण्यात आले. या रस्त्याला जोडणारा सरळ घाडीवाडी मध्ये येणारा रस्ता करण्यात आला. याच रस्त्याचा वापर करून गेली कित्तेक वर्षे सर्व दैनंदिन व्यवहार पार पडत होते. त्यामध्ये कधी कोणी हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे सदरची जागा कोणाची आहे, सदर जमिनीची ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे का? याची शहानिशा करण्याची गरज कधीच पडली नाही. सदर रस्ता हा “ग्रामपंचायत पायवाट रस्ता” असा उल्लेख शासन दप्तरी झालेला आहे. मात्र सदर जमीन मालक यांनी पूर्वापार सुरू असलेला रस्ताच बंद करून टाकला आहे. त्या ठिकाणी कायमस्वरूपी वृक्ष लागवड करून हा रस्ता पूर्णपणे रहदारीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे घाडी वाडीतील ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. घरातून बाहेर पडण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वयोवृद्ध आजारी व्यक्ती, यांना उपचारासाठी डोळीने खांद्यावरुन न्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही अडचणीचे ठरले आहे. तरी याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती दखल घेऊन नेरुर घाडी वाडा ग्रामस्थांना कायमस्वरूपी रस्ता मिळावा यासाठी आपल्या स्तरावरुन योग्यती कार्यवाही करावी. या मागणीसाठी आज नेरूर घाडीवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले आहे. जोरजोरात घोषणाबाजी करत प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधले आहेत. हे लाक्षणिक उपोषण नेरूर माजी सरपंच प्रसाद पोइपकर यांच्या नेतृत्वाख़ाली करण्यात आले. या लाक्षणिक उपोषण आंदोलनात निलेश घाडी, हेमंत घाडी, दशरथ घाडी, महेश घाडी, अरुण घाडी, यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page