दोडामार्ग /-

कसई दोडामार्ग नगरपंचायत आरक्षण सोडत खालील प्रमाणे :
प्रभाग क्र : १ ओबीसी (पुरुष), प्रभाग क्र. ०२ सर्वसाधारण खुला प्रवर्ग, प्रभाग क्र. ०३ खुला प्रवर्ग महिला, प्रभाग ०४ ओबीसी महिला, प्रभाग ०५ खुला प्रवर्ग महिला, प्रभाग क्र. ०६ सर्वसाधारण खुला, प्रभाग क्र ०७, सर्वसाधारण खुला प्रवर्ग, प्रभाग क्र.०८ ओबीसी महिला, प्रभाग क्र. ०९ खुला प्रवर्ग, प्रभाग क्र १० ओबीसी सर्वसाधारण, प्रभाग ११ खुला प्रवर्ग, प्रभाग क्र १२ महिला खुला, प्रभाग क्र, १३ खुला प्रवर्ग महिला, प्रभाग क्र १४ बि सी महिला, प्रभाग क्र १५ खुला सर्वसाधारण, प्रभाग क्र १६ खुला प्रवर्ग महिला, प्रभाग क्र १७ ,खुला प्रवर्ग महिला.

या सोडत कार्यक्रमात निर्वाचन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी, तहसीलदार दोडामार्ग, निवडणूक नायब तहसीलदार तसेच कसई दोडामार्ग मुख्याधिकारी यांनी काम पाहिले.असे आरक्षण जाहीर झाले असून मागील काही नगरसेवक उमेदवारांना या आरक्षणामुळे आपला प्रभाग बदलण्याची पाळी आली आहे, तसेच काहीच्या पारड्यात त्यांचे प्रभाग आरक्षण मनासारखे असून त्यांच्या मनात खुशी तर आरक्षण विरोधी पडल्याने जुन्या व नव्या उमेदवारांच्या मनात मात्र “गम” दिसत होता. एकूण इच्छुकांची भाऊ गर्दी, नगरपंचायत मध्ये सत्तेसाठी असणारी रस्सीखेच त्यात महिलांचे वाढलेले प्रमाण यामुळे ही नगरपंचायत निवडणूक चुरशीची होईल तर “महिलाराज” पहावयास मिळतंय काय याकडे ही शहर वासीयांचे डोळे लागले आहेत, प्रत्त्येक उमेदवार मात्र या आरक्षण सोडतीमुळे निश्चित आपली उमेदवारी जपाण्यासाठी प्रयत्न करेल त्यांची रणनीती येणारा काळच ठरवणार हे मात्र निश्चित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page