कुडाळ /-

रोजी सकाळी ११.३० वाजता कुडाळ तालुक्यातील गोवेरी-तेंडोली येथील श्री. विजय प्रभूखानोलकर यांच्या आंबा / काजू बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीमध्ये वन्यप्राणी बिबट पडल्याची माहिती मिळताच कुडाळ वनपरिक्षेत्राचे बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या टाकीत पाहाणी केली असता तो (ठिपक्याचा) नियमित बिबट नसून, काळ्या रंगाचा असल्याची खात्री झाली.

बचाव पथकाने शिताफीने पाऊल उचलत सदर बिबट वन्यप्राण्यास रेस्क्यु करण्याच्या हालचालींना वेग दिला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या ७ ते ८ फूट विहिरीमध्ये पिंजरा सोडत त्यास पिंजऱ्यात घेत. सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर त्या ब्लॅक पॅन्थरची पशुवैदयकिय अधिकारी, कुडाळ यांचेकडून वैदयकिय तपासणी केली असता, तो सुद्रुढ असल्याची खात्री झाली.

मादी प्रजातीच्या या ब्लॅक पॅन्थरचे वय सुमारे ८ ते १२ महिने असल्याने मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा चिफ वाईल्ड लाईफ वॉर्डन महाराष्ट्र राज्य श्री. सुनिल लिमये तसेच मा. मुख्य वनसंरक्षक (प्रा.) वनवृत्त कोल्हापूर श्री. डॉ. व्ही. क्लेमेट बेन यांचे मार्गदर्शनाखाली त्या बछडयाची त्याच्या आई सोबत पुर्नभेट (Re-Union) करुन देण्याचे निश्चित करणेत आले. त्यानुसार मा. उपवनसंरक्षक (प्रा.) वनविभाग सावंतवाडी श्री. शहाजी नारनवर यांनी त्यावर निर्णय घेत तशा सुचना वनपरिक्षेत्र कुडाळचे बचाव पथकास दिल्या.

दि. १२/११/२०२१ रोजी वनपरिक्षेत्र कुडाळ बचाव पथकाने पुणे येथील RESQ या टीमच्या मदतीने कुडाळ वनविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये रेस्क्यु करणेत आलेल्या मादी बछडयाच्या आईचा शोध घेण्यास सुरवात केली व त्याची खात्री होताच ठीक ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावत त्याच्या हालचाली कॅमे-यात टिपण्यास सुरवात केली.

वनविभागाचे क्षेत्रात मादी (आईचा) वावर दिसून येताच तिथे बछडा व आई यांची भेट करुन देण्याच्या कार्यवाहीला वेग आला. ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले. तत्पूर्वी निरीक्षणाखाली / निगराणीखाली असणाऱ्या बछडयाने पिंजऱ्यात ठेवण्यात आलेल्या कोबडीला आपले भक्ष बनवत तिचे मांस खाल्लेने सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला..

सायंकाळी ४.०० चे सुमारास वनपरिक्षेत्र कुडाळ बचाव पथकाने वैदयकिय अधिकारी कुडाळ यांचेकडून त्याची तपासणी करुन आईचा (मादी बिबट) वावर असलेल्या परिसरात मुक्त करणेसाठी त्या मादी बछडयास पिंजऱ्यासहीत नेण्यात आले. तिथे RESQ पुणे टीमची तांत्रिक मदत घेत आई (बिबट) च्या प्रतिसादाची प्रतिक्षा सुरु झाली.

अथक प्रयत्नाने रात्री उशिरा आईने पिंजऱ्यातील आपल्या पिल्लाचा अंदाज घेतला. परंतु हुलकावणी देत तिथून ती परांगदा झाली. पिंजऱ्याजवळ येऊन तिने दर्शन दिल्याने बचाव तथकाच्या आशा पल्लवित झाल्या.

पुन्हा जोमाने दि. १३/११/२०२१ रोजी सकाळपासून आई व पिल्लू यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. दरम्यान मा. उपवनसंरक्षक (प्रा) वनविभाग सावंतवाडी हे स्वतः रात्री उपस्थित होते. त्यांचे समक्ष आज रात्री ८.४० च्या सुमारास आई पिंजऱ्यातील पिल्लाजवळ येताच पिंजऱ्याचा दरवाजा उघडणेत आला. तेव्हा पिल्लू आईला बिलगले व आपल्या उर्वरीत आयुष्याचा आनंदी प्रवास पुनःश्च सुरु केला.

ब्लॅक पॅन्थर ही बिबट प्रजातील अत्यंत दुर्मिळ प्रजाती असून, त्यांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात मेलॅनिन (Melanin) रंगद्रव्य (Pigments) तयार झाल्याने व जनुकिय बदलांमुळे त्याचा रंग काळा दिसून येतो. जिल्हयातील या अतिशय दुमिळ अशा काळ्या रंगाच्या बिबट (ब्लॅक पॅन्थर) चे वनविभागाने यशस्वी रेस्क्यु केल्याने सिंधुदुर्गाचे वैभव व वेगळेपण सांगणारा हा अत्यंत दुमिळ ब्लॅक पॅन्थर सिंधुदुर्गातील जंगलात त्याच्या आईची भेट घडवून दिल्याने वनविभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वन्यप्राण्यांबाबत सिंधुदुर्गवासियांचे आपलेपण व प्रेम यामुळे येथील जैवविविधता समृध्द इ आल्याचे दिसून येते.

सदर बचावकार्य / पुर्नभेट मा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा चिफ वाईल्ड लाईफ वॉर्डन महाराष्ट्र राज्य श्री. सुनिल लिमये, मा मुख्य वनसंरक्षक (प्रा.) वनवृत्त कोल्हापूर श्री. डॉ. व्ही. क्लेमेट बेन, मा. उपवनसंरक्षक (प्रा.) सावंतवाडी श्री. शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी श्री. आय. डी. जालगावकर तसेच मानद वन्यजीव रक्षक श्री. नागेश दप्तरदार व श्री महादेव भिसे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ श्री. अमृत शिंदे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी श्री मदन क्षिरसागर, वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनपाल मठ अण्णा चव्हाण, वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट वनरक्षक नेरूर त हवेली सावळा कांबळे, वनरक्षक मठ सुर्यकांत सावंत वाहनचालक राहुल मयेकर यांनी RESQ पुणे संस्थेच्या व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page