कुडाळ /-

१६६३ साली याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुडाळ प्रांतात झाले होते आगमन!

तरुण वर्गात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी इतिहासाबद्दल जागृती व्हावी तसेच टि.व्ही./मोबाईल मध्ये गुंतलेली तरुण पिढी पुन्हा इतिहासातून प्रेरणा घेऊन पराक्रमी व्हावी, यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने दीपावलीनिमित्त आयोजित ऐतिहासिक गड-किल्ले प्रतिकृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण २२ स्पर्धक या स्पर्धमध्ये सहभागी होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ काल दिनांक ८ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. बक्षिस वितरण स्पर्धेच्या सुरुवातील राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी माहाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांच्या किल्ले प्रतिकृती ठिकाणी जाऊन बक्षिसे देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
बक्षिस वितरणवेळी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे श्री. रमाकांत नाईक म्हणाले की, क्रमांक कोणाचा आला हे महत्ताचे नाही. ऐतिहासिक गढ-किल्ले प्रतिकृती स्पर्धेच्या माध्यमातून मुलांनी इतिहासाची पाने चाळली, हे महत्त्वाचे. स्पर्धकांननी आमच्या या प्रयत्नांना स्पर्धेच्या दृष्टीने न बघता छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्व तरुण वर्गात पोहोचविण्याचा प्रयत्न असे समजावे. पुढील वर्षी यापेक्षा मोठ्या जोमाने स्पर्धा घेणार असल्याचे ते म्हणाले.

कालच्या ऐतिहासिक दिवशी कुडाळ येथील राजमाता जिजाऊ स्मारक व शिवाजी महाराज स्मारक याठिकाणी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. १६६३ साली याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुडाळ प्रांतात आगमन झाले होते. या अनुषंगाने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
१) प्रथम : दुर्ग वेडे, नाबरवाडी (सिंहगड)
२) द्वितीय : ओम साई मित्र मंडळ, हिंदू कॉलनी (राजगड)
३) तृतीय : साईप्रसाद मसगे, गुढीपूर (सिंधुदुर्ग)
४) उत्तेजनार्थ : मावळे स्वराज्याचे, शांतिनिकेतन सोसायटी, दत्त मंदिर नजीक (पदमदुर्ग)
५) उत्कृष्ट रचना : शिवम न्हानू गावडे, नाबरवाडी ( जंजिरा)
६) उत्कृष्ट मांडणी : केळबाई युवक मित्रमंडळ (प्रतापगड)
७) उत्कृष्ट वेशभूषा : केळबाई युवक मित्रमंडळ (प्रतापगड)
८) विशेष प्रयत्न : शिवकन्या मंडळ, अयोध्या पार्क समोर, केळबाईवाडी (राजहंस गड, बेळगाव)
९) गड-किल्ल्यातील सातत्य (परंपरा जोपासणे) –
महेश ओटवणेकर, वर्दम तिठा (शिवनेरी)
धैर्यशील प्राईड (मुरुड जंजिरा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page