चौके /-


चौके धामापूर कुडाळ रस्त्यावर काळसे गावातील रवळनाथ मंदिर ते काळसे ग्रामपंचायत दरम्यान रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे आज मंगळवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांनी स्वखर्चाने दगड आणि माती आणून आणि श्रमदान करून बुजवले.
जून महिन्यात म्हणजे सुमारे पाच महिन्यांपुर्वी मालवण चौके कुडाळ यांनी नियमित वाहतूकीच्या मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरल्यानंतर मंगळवारी काळसे गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र परब यांच्यासह गावातील काही ग्रामस्थांनी आणि बाल सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्रमदानकरून खड्डे बुजवले. या रस्त्यावरून नियमित ये जा करणाऱ्या ग्रामस्थांना आणि आता मोठ्या प्रमाणवर येणाऱ्या पर्यटकांना खड्डयांमुळे होणारा त्रास कमी व्हावा आणि याठिकाणी अपघात होऊन दुर्घटना घडू नये या उद्देशाने रस्त्यावरील खड्डे बुजवले. आता यानंतर मात्र आठ दिवसांपूर्वीच काळसे गावातीलच काही ग्रामस्थांनी प्रशासनाला चौके ते कुडाळ रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा २० नोव्हेंबरला रास्ता रोको करणार असा आंदोलनाचा ईशारा लेखी निवेदनाद्वारे दिला होता. ते आंदोलन होणार कि नाही याकडेही सर्वांचे लक्ष असेल.
यावेळी राजेंद्र परब यांच्यासोबत किशोर राऊळ कमलाकर आजगावकर, विद्या पाटील , दत्तराज साळसकर, ज्ञानेश्वर सातार्डेकर , संजय नाईक , दादा परब , रमेश परब , संतोष बागवे. प्रविण परब , आशिष परब, रोहित परब , स्वप्नील जुवेकर , सिद्धेश काळसेकर , ऋतिक परब , गणेश परब , विनय परब , अक्षय परब , संतोष राऊळ , रोहन परब , संतोष सावंत , संदेश परब, संजू परब , गौरेश परब , अमोल परब , निखिल परब, नाना परब , प्रशांत परब यांनी श्रमदान केले. यावेळी काळसे सरपंच केशव सावंत यांनी श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांना तीन हजार रुपये आर्थिक सहकार्य केले.
” गावातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि खड्ड्यात पाणी साचल्यानंतर खड्डयांच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे असणारी अपघातांची शक्यता होती. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग यावर उपाययोजना करून डागडुजी करेल या प्रतीक्षेत होतो पण गेल्या पाच महिन्यात त्यांच्याकडून कोणतीच हालचाल न झाल्यामुळे शेवटी आज आम्ही ग्रामस्थांनीच श्रमदानाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. यामागे कोणतेही राजकारण नाही किंवा राजकीय हेतू नाही तर फक्त समाजाच्या आणि गावाच्या हिताच्या दृष्टीने हा उपक्रम आम्ही सर्वांनी हाती घेतला. आणि यापुढेही समाजाच्या हितीची कामे ग्रामस्थ म्हणून आम्ही करतच राहू. ” अशी प्रतिक्रिया यावेळी राजेंद्र परब यांनी यावेळी दिली.
फोटो माहिती :-
१) सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजवण्यास असमर्थ ठरल्यानंतर काळसे ग्रामस्थांनी श्रमदान करून चौके – कुडाळ रस्त्यावरील काळसे ग्रामपंचायत समोरील खड्डे बुजवले यावेळी राजेंद्र परब , किशोर राऊळ, संजय नाईक , दत्ता साळसकर आणि इतर ग्रामस्थांनी श्रमदान केले.
२) खड्डे बुजवण्यासाठी लागणारी माती भरताना बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते.
( छाया :- अमोल गोसावी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page