शिवसेना कुडाळ तालुका घावनळे येथे मेळाव्यात ४०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा उपसरपंच दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ /-

आजच नव्हे तर भविष्यात कधीही नारायण राणे अंगावर आले तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ.सिंधुदुर्गात राणेंसारख्या गद्दाराची दाळ शिजू देणार नाही, अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी घवनाळे येथील कुडाळ तालुका शिवसेना मेळाव्यात बोलताना केली आहे. आजच नव्हे तर भविष्यात कधीही नारायण राणे अंगावर आले तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. सिंधुदुर्गात राणेंसारख्या गद्दाराची डाळ शिजू देणार नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.ते पुढे म्हणाले की,राणेंना हिमंत असेल तर नारायण राणे यांनी पुन्हा एकदा वैभव नाईक यांच्याविरोधात कुडाळ-मालवण मतदारसंघात उभे राहून दखवावे,त्यांचा पराभव ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.त्यांचा प्रराभव झाल्याशिवाय राहाणार नसल्याचेही खा.राऊत यांनी सांगितले.

शिवसेना कुडाळ तालुका घावनळे येथे मेळाव्याचे आयोजन केले होते या ममेळाव्यात पंचक्रोशीतील जवळपास ४०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी घवनाळे उपसरपंच श्री. दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत,उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत कुडाळ- मालवण चे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्व मानुन शिवसेनेत प्रवेश केला आहे.या सर्वांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी डपीडिसी मधून १५ लाख निधी आमदार यांच्या फंडातून १० लाख निधी असा २५ लाख निधी तात्काळ मद्धे घावनाळे गावासाठी मंजूर केला आहे.

नारायण राणेंनी हिमंत असेल तर पुन्हा एकदा नाईक यांच्याविरोधात उभे राहावे, कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवून दाखवावी. त्यांचे डिपॉझिट जप्त नाही केले तर शिवसेनेचे नाव सांगणर नाही.दोनदा नारायण राणेंच्या पोराचा पराभव झाला, एकदा त्यांचा झाला.सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही हे जिल्ह्याने दाखवून दिल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की आता शिवसेनेत येणाऱ्याना विकासासाठी निधी दिला जाणार त्यात सरपंच,उपसरपंच ,पंचायत समिती सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यास त्यांना तात्काळ १५ लाख विकास निधी दिला जाईल असे सामंत यांनी सांगितले.

पालकमंत्री उदय सामंत यांनी साधला भाजपावर निशाणा ,दरम्यान यावेळी बोलताना पात्रकमंत्री उदय सामंत यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे. केंद्र सध्या काय करत आहे, त्यांचे सर्व कारनामे महाराष्ट्रातील जनता पाहात  आहे. महाराष्ट्रातील मतदार याची नक्कीच दखल घेतील, आणि भाजपाला त्यांची जागा दाखवतील असे यावेळी सामंत यांनी म्हटले आहे. दरम्यान राऊतांच्या टीकेवर नारायण राणे काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत,शिवसेना खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक,जिल्हा संपर्क प्रमुख अरुंणभाई धुडवडकर ,आमदार वैभव नाईक , जिल्हाप्रमुख संजय पडते ,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत ,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर ,कुडाळ शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक,अतुल बंगे ,विकास कुडाळकर ,मंदार शिरसाट ,बबन बोभाटे ,सचिन काळप ,बाळा पावसकर ,राजू गवंडे ,श्रेया परब,उपसरपंच दिनेश वारंग अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page