सावंतवाडी नगरपालिका गेली चुकीच्या लोकांच्या हातात..

सावंतवाडी /

योगायोगाने नगराध्यक्ष झालेले संजू परब हे मावळते नगराध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे आता फक्त एक महिना दहा दिवस शिल्लक आहे.त्यांच्या मुळे सावंतवाडीची अधोगती झाली.अशी खिल्ली उडवत,ज्या व्यक्तीला पालिकेचे बजेट माहित नाही त्यांना मी आणलेला निधी कसा समजणार, असे प्रत्युत्तर आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिले.

दरम्यान माझ्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्या संजू परब यांची राजकीय उंची नाही. त्यांची पात्रता काय हे त्यांच्या नेत्यांनी त्यांना दाखवून दिले आहे. त्यामुळे अशा व्यक्तीवर बोलण्यासाठी मला वेळ नाही, असेही केसरकर यांनी सांगितले. नगराध्यक्ष परब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केसरकर यांच्यावर आरोप केले. याला पत्रकार परिषदेत श्री.केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page