वैभववाडी /-

पावणे दोन महिण्यापूर्वी बेपत्ता झालेले सडुरे तांबळघाटी येथील बिरु शिवाजी काळे वय ४५ यांचा सांगाडा शनिवारी सकाळी सडुरे राववाडीनजीक गणपती कोंड येथे सुखनदी पात्रात  सापडला आहे. अंगावरील कपड्यावरुन नातेवाईकांना ओळख पटली आहे. याबाबत दिपक यशवंत चव्हाण रा. सडुरे चव्हाणवाडी यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत खबर दिली आहे. दि. १४ सप्टेंबर रोजी बीरु काळे हे शेतात जातो असे सांगून घरातून गेले होते. संध्याकाळी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे सर्वत्र शोधाशोध करुन सापडले नव्हते. वैभववाडी पोलिस ठाणेत त्यांची पत्नीने पती नापत्ता झालेची खबर दिली होती. दरम्यान शनिवारी सकाळी सडुरे राववाडीनजीक गणपती कोंड येथे ग्रामस्थांना मानवी सांगाडा आढळून आला. याबाबत वैभववाडी पोलिसांना खबर देण्यात आली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक सावंत, हेड कॉन्ट्रेबल खाडे, महिला पोलिस हवालदार माधुरी अडूळकर, पोलिस नाईक अभिजीत तावडे, पो. कॉन्ट्रेबल संदीप राठोड, यांनी घटनास्थळी जाऊन जाऊन पंचनामा केला. मानवी सांगाड्यावर निळी पॅंट व लाल रंगाचा शर्ट होता. या कपड्यावरुन मयताच्या मुलाने सांगाडा आपल्याच वडीलांचा असल्याचे पोलिसांना सांगत हांबरडा फोडला.

पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहीती दिली. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सयाजी धर्मे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. विखुरलेल्या अवस्थेतील हा सांगाडा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर पुढील सोपस्कर कुटुंबीयांकडून करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. यावेळी पोलिस पाटील शशिकांत नारकर, तंटामूक्त अध्यक्ष दीपक चव्हाण, माजी सरपंच विजय रावराणे, नवलराज काळे, संजय जंगम व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page