मालवण /-

लेबनान येथे २२ देशांच्या सहभाग स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या भारताच्या श्रिया संजय परब हिचा कांदळगाव या मूळगावी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते नागरी सन्मान करण्यात आला. श्रिया परब यांना विशेष मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांनी पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला ओळख दिली. त्याच सिंधुदुर्गमधील श्री देव रामेश्वर कांदळगाव भूमीतील श्रिया परब ‘मिस टुरीझम’ युनिव्हर्स आशिया २०२१ हा बहुमान मिळवते ही बाब सिंधुदुर्गवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. श्रिया हिची जागतिक स्तरावरील यशाची पताका अशीच फडकत रहावी. एक भाऊ या नात्याने श्रिया व तिच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीर उभा असेन. असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला. लक्ष्मीपूजन उत्सव समिती कांदळगाव, श्री देव रामेश्वर देवस्थान कांदळगाव, ग्रामपंचायत कांदळगाव व कांदळगाव ग्रामस्थ यांच्या वतीने मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ विजेत्या श्रिया संजय परब हिचा भव्य नागरी सन्मान भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते कांदळगाव श्री देव रामेश्वर मंदिर येथे करण्यात आला. यावेळी रामेश्वर देवस्थान अध्यक्ष शिवराम परब, सचिव उदय राणे, सरपंच उमदी परब, लक्ष्मीपूजन उत्सव समिती अध्यक्ष शामसुंदर मुळये, उमेश कोदे, उपसरपंच आंनद आयकर, सदस्य अक्षता परब, मनोज आचरेकर, भाग्यश्री डीचोलकर, राजेश कांदळगावकर, अर्चना कोदे, पोलीस पाटील शीतल परब, आशु आचरेकर यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यासह भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, सभापती अजिंक्य पाताडे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे आदी उपस्थित होते. रामेश्वर चरणी साकडे ; निलेश राणे पुन्हा दिल्लीच्या तख्तावर… भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी श्री देव रामेश्वरचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनी गाऱ्हाणे घालताना ‘कोकणचा बुलंद आवाज पुन्हा दिल्लीच्या तख्तावर पोहचुदे’ पुन्हा एकदा निलेश राणे खासदार होऊदेत, असेच साकडे रामेश्वर चरणी घातले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page