वेंगुर्ला /-


गेली १३ वर्षे सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करणे या कै. निलेश राऊळ मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम आहे. मंडळाने अतिशय सूक्ष्म नियोजन करून समाजातील विविध घटकांचा सन्मान केला, याचे कौतुक करावे तेवढे कमीच. जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी रक्ताची अतिशय कमतरता होती. मात्र आज विविध मंडळे अशाप्रकारे रक्तदान शिबिरे घेत आहेत हे आपल्या जिल्ह्यासाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी रेडी येथील रक्तदान शिबिर प्रसंगी केले.
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील कै. चंद्रकांत उर्फ निलेश राऊळ यांच्या स्मृतिदिना निमित्त कै. चंद्रकांत उर्फ निलेश राऊळ चॅरिटेबल ट्रस्ट, रेडी यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर, रेडी पंचक्रीशी कोरोना योद्धा सन्मान व पंचक्रीशीतील १० वी १२ वी तसेच गुणवंत विद्यार्थी सन्मान कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तर पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांच्याहस्ते कै. निलेश राऊळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी उपाध्यक्ष तथा गटनेते रणजित देसाई, महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, जि. प. सदस्य राजन मुळीक, गजानन देवस्थान ट्रस्टचे प्रकाश कामत, वेतोबा देवस्थान विश्वस्त जयवंत राय, वेंगुर्ला उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेविका पूनम जाधव, तुळस सरपंच शंकर घारे, वेंगुर्ले माजी सभापती अजित सावंत, रुपेश कानडे, उपजिल्हा रुग्णालयचे डॉ. देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, शिरोडा श्री देवी माऊली देवस्थान विश्वस्त अशोक परब, डॉ. प्रसाद साळगावकर, पेंडूर माजी सरपंच संतोष गावडे, रेडी सरपंच रामसिंग राणे, पं. स. सदस्य मंगेश कामत, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे, आरवली सरपंच तातोबा कुडव, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव यांच्यासाहित आरवली, रेडी, शिरोडा, सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली व भाजपचे मनीष दळवी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. येथील आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्याना ट्रस्ट च्या वतीने टी- शर्ट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
ट्रस्ट चे अध्यक्ष तथा जि. प. सदस्य प्रितेश राऊळ यांनी प्रस्ताविकात सांगितले की, या ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक उपक्रम केले जातात. १३ वर्षांपूर्वी कै. निलेश राऊळ यांनी ही रक्तदानाची संकल्पना मांडली होती ती आम्ही आज अखंडितपणे सुरू ठेऊन निलेशच कार्य जोपासण्याचे काम करतोय व यासाठी सर्वच स्तरावरून मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र म्हापसेकर, रणजित देसाई, शर्वाणी गावकर, अनुश्री कांबळी यांनी आपल्या मनोगतातून प्रितेश राऊळ यांच्या व ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. दरम्यान या कार्यक्रमात कोरोनाच्या कालावधीत धान्य वाटप, विविध आरोग्य विषयक वस्तू वाटप तसेच समाजपयोगी कार्य करणाऱ्या श्री वेतोबा देवस्थान, श्री देवी माऊली देवस्थान शिरोडा, श्री गजानन देवस्थान रेडी, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा डॉ. देसाई व टीम, सिंधुदुर्ग लाईव्ह, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर- सामंत, श्री देवी माऊली देवस्थान रेडी, सोनसुरे मठाधिपती श्री आजोबा, लुपिन फाऊंडेशन,आमदार दिपक केसरकर यांच्या वतीने संतोष मांजरेकर यांचा, आयएलपीएल कंपनी, रेडीतील महाले कुटुंबीय, रिमा मेस्त्री व कुटुंबीय, उल्हास नरसुले, गणेश माऊली संस्था, कुलस्वामिनी लॉजीस्टिक प्रा. ली ट्रस्ट, उल्लास नरसुले, रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर, दशरथ राणे व मित्रमंडळ, प्रकाश पडवळ, महादेव उर्फ भाऊ अंडुर्लेकर, प्राणी जीवन सहयोग संस्था, प्रथमेश रेडकर, रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र , डॉ साळगावकर, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणारे बाबल गावडे, सचिन शेलटे, तौक्ते चक्री वादळ यामध्ये मोलाचे सहकार्य किरण इलेक्ट्रिकल व वायरमन सहकारी, महसूल कर्मचारी संजय मेस्त्री यांच्यासाहित रेडी, शिरोडा, आरवली, सागरतीर्थ ग्रामपंचायत सरपंच, ग्रा. पं. सदस्य यांचा कोरोना योद्धा म्हणून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे विद्यार्थी, रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेवक, नर्स, कर्मचारी, पंचक्रीशीतील आशासेविका, अंगणवाडी सेविका, यांच्यासाहित वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page