वेंगुर्ला /-


भारतीय जनता पार्टीतर्फे दिपावली सणाचे औचित्य साधून ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान ‘दीपज्योति नमोस्तुते’ वेंगुर्ला दिव्य दिवाळी उत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत स्थानिकांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लक्ष्मीपूजन अर्थात ४ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ले येथील रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात इकोफ्रेंडली आकाशकदील स्पर्धा, ७ नोव्हेंबरला वेंगुर्ला कॅम्प येथील त्रिवेणी संगम उद्यान परिसरात दीपोत्सव व दिपावली शोटाईम अंतर्गत अनिता करावके हा गीतगायन, नृत्य फनीगेम्सचा कार्यक्रम, ८ रोजी लोकनृत्य उत्सव तर ९ रोजी दिपसंध्या संगीतरजनीमध्ये सावंतवाडी येथील सद्गुरु संगीत विद्यालयाचा गीतझंकार हा अभंग, भक्तिगीत व सदाबहार चित्रपट गीतांचा कार्यक्रम होणार आहे. इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धा –
रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेसाठी प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे २००० १५००, १००० व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी ५०० रुपये व प्रशस्तीपत्र असे परितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धा वेंगुर्ला तालुका मर्यादित असून स्पर्धकांनी आकाशकंदील बनविताना प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करू नये. अधिक माहिती व स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ९४२२४३६७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.एक पणती प्रकाशाची – वेंगुर्ले कॅम्प येथील नव्याने विकसित करण्यात आलेल्या त्रिवेणी संगम उद्यान येथे ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान दीपपूजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत ७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दीपोत्सव होणार आहे. उद्यानाच्या सभोवताली उपस्थितांकडून दीपपूजन करण्यात येणार आहे ‘एक पणती प्रकाशाची” या उपक्रमात सहभागी होत प्रत्येकाने ज्ञान, उन्नती व प्रकाशाचा दीप प्रज्वलीत करावा, असे आवाहन वेंगुर्ला भाजपतर्फे करण्यात आले आहे. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता दिपावली शोटाईम अंतर्गत अनिता करावके यांचा गीतगायन, फनीगेम्स, मिमिक्री आणि धम्माल मस्तीचा कार्यक्रम होणार आहे.लोकनृत्य, समईनृत्य आविष्कार -८ रोजी सायंकाळी वाजता स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकनृत्य, समईनृत्य व पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील नामवंत संघाची बहारदार नृत्ये सादर होणार आहेत. स्थानिकांनी सहभाग घेण्यासाठी भाजपच्या वेंगुर्ला कार्यालयात संपर्क साधावा.
गीतझंकार संगीत रजनी –
वेंगुर्ला दिव्य दिवाळी उत्सवाचा समारोप सावंतवाडी येथील सद्गुरु संगीत विद्यालयाच्या गीतझंकार या संगीतरजनीने होणार आहे. भक्तीगीत, भावगीत व नाट्यगीतांची अप्रतिम मेजवानी यानिमित्ताने वेंगुर्लावासीयांना मिळणार आहे. या संपूर्ण महोत्सवाचा वेंगुर्लेतील नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page