मालवण /-

गेल्या काही महिन्यात गोवंश चोरीचे व कत्तलचे प्रमाण वाढले असून आमदार वैभव नाईक यांच्या मतदार संघातच गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याना मुद्देमालासकट अटक झाली असताना याची चौकशी करायला आमदारांना वेळ नाही. खासदार विनायक राऊत यांनीही त्यावर चर्चा काही भाष्य केलेले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. दोन दिवसापूर्वी भाजपा पदाधिकारी अविनाश पराडकर आणि शेकडो गोवंश कार्यकर्ते यांच्या माध्य्मातून गोवंश कत्तल करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मोरक्याना मुद्धेमालासकट अटक करण्यात आली. चौकशी अंती गेले एक दिड वर्ष या प्रकारे गोवंश कत्तल करणाऱ्या टोळ्या स्थानिक पातळीवर आपले एजंट नेमून हे विघातक कार्य बिनदिक्कत पणे चालू ठेवलेले आहे, असे समोर आले आहे . गेल्या काही महिन्यात गोवंश चोरीचे प्रमाण वाढले असून प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे शेतकरी याबाबतीत तक्रार देण्याच्या मनस्थितीत नसतात. हा प्रकार ज्या मतदार संघात घडला त्या आमदार वैभव नाईक यांना दोन दिवस होऊनही याप्रकरणी चौकशी करायला सवड नाही. या भागाचे भाजपच्या मतावर निवडून आलो याचे भान विसरून भाजपच्या पक्षांतर्गत विषयावर त्वरित भाष्य करून स्वतःची चेष्टा करून घेणारे खासदार विनायक राऊत यांनीही याविषयी अजून भाष्य केले नाही. त्यामुळे या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्वरित लक्ष देऊन जिह्यातील या टोळीचा पर्दाफाश करून यातील स्थानिक एजंट व समाविष्ट समाजकंटकांना अटक करावी, असेही भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page