सावंतवाडी /-

वाढत्या महागाई विरोधात तालुका युवा सेनेच्या वतीने शहरात आज सायकल रॅली काढून मोदी सरकारचा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘हेच का अच्छे दिन’ म्हणत तसेच फराळाचे वाटप करत मोदी सरकारच्या निषेध व्यक्त करण्यात आला. देशात पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल गॅस आदी विविध वस्तुचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य हतबल झाले आहे. महागाईने सर्वजण त्रस्त झाले असून राज्यात केंद्र सरकार विरोधात युवा सेनेकडून राज्यव्यापी आंदोलन हाती घेण्यात आले. आज सावंतवाडीतही युवा सेनेच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. यावेळी आम. दीपक केसरकरदेखील प्रमुख उपस्थित होते.

यावेळी युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेना तालुका प्रमुख योगेश नाईक, विनायक सावंत, शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर, नगरसेविका अनारोजिन लोबो, माधुरी वाडकर, भारती मोरे, दिपाली सावंत, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी शिवसेना प्रवक्ते डॉक्टर जेपेद्र परूळेकर माजी नगरसेवक सुरेश भोगटे, गजानन नाटेकर, अब्जू सावंत, एकनाथ नारोजी, बबन राणे, आदित्य आरेकर, संजय तानावडे, रश्मी माळवदे आधी मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी तसेच शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page