महा आवास अभियान पुरस्कार पटकाविल्यामुळे इन्सुली ग्रामपंचायतीचे नाव शिखरावर

सावंतवाडी /-

मागील कार्यकारिणीतील माजी ग्रामपंचायत सरपंच सौ.पुजा पेडणेकर,उपसरपंच सदाशिव राणे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची पोचपावती मिळाली

मागील ग्रामपंचायत कार्यकारिणीने‌ पाठवलेल्या घरकुल प्रस्तावात इन्सुली गावाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला,या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आमदार दिपक केसरकर व वरीष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच गंगाराम उर्फ तात्या वेंगुर्लेकर यांनी तो स्वीकारला

याअगोदर सुद्धा इन्सुली ग्रामपंचायतीला स्मार्ट ‌ग्राम पुरस्कार पण मिळाला आहे.महा आवास अभियान पुरस्कार पटकाविल्यामुळे इन्सुली ग्रामपंचायतीचे सर्वच थरातून अभिनंदन केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page