वेंगुर्ला /-


सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जनतेला भेडसावणारा आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा वैद्यकिय आघाडी मार्फत आरोग्यदुत ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय आघाडी चे प्रदेश सहसंयोजक डाॅ. अमेय देसाई यांनी वेंगुर्ले येथील भाजपा कार्यालयात सत्कार प्रसंगी दिली.भाजपा तालुका कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांचे हस्ते डाॅ. अमेय देसाई यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेंगुर्ले तालुक्यातील रुग्णांना भेडसावणारया समस्या मांडल्या.उपजिल्हा रुग्णालयात एकच डाॅक्टर असल्याने रुग्णांची होणारी परवड,तज्ञ डाॅक्टर नसल्याने धुळखात पडलेली मशनरी याबाबत पाढाच वाचला.वेंगुर्ले तालुक्यातील रुग्णांना गोवा – बांबुळी हाॅस्पीटल शिवाय पर्यायच नाही.त्यामुळे भाजपा च्या माध्यमातून गोव्यात जाणाऱ्या रुग्णांना मदत करण्यासाठी एक यंत्रणा उभी करावी अशी मागणी सर्वांनी केली.त्यावेळी डाॅ. अमेय देसाई यांनी लवकरच वैद्यकीय आघाडी मार्फत आरोग्यदुत ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच आरोग्यदुतांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे जनसंपर्क अधिकारी अनिल म्हात्रे यांचाही सत्कार तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण,जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,न.प.उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल,जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, नगरसेवक प्रशांत आपटे,धर्मराज कांबळी , नगरसेविका साक्षी पेडणेकर , श्रेया मयेकर, पुनम जाधव , महिला मोर्चा च्या रसिका मठकर,किसान मोर्चा चे जि.सरचिटणीस बाळु प्रभु , ता.चिटनीस समीर चिंदरकर, किसान मोर्चा चे अध्यक्ष बापु पंडित, ज्ञानेश्वर केळजी , बुथप्रमुख शेखर काणेकर व विनय गोरे, कार्यालय प्रमुख छोटु कुबल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page