कुडाळ /-

रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगड यांच्या संयुक्तविद्यमाने गुरुवंदना या नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे गुरुवारी हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये जिल्ह्यातील १२५ शिक्षकांना गुरुवंदना अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, रोटरी व लायन्स क्लबचे सदस्य हे राजकारणापासून दूर राहून समाजकरणाचे चांगले काम करतात. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक अत्यंत मेहनतीने विद्यादानाचे काम करतात. त्यांचा सन्मान रोटरीने केला हि कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगत शिक्षकांचे व रोटरीचे कौतुक केले. आमदार वैभव नाईक म्हणाले, रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. रोटरीच्या माध्यमातून कोविड कालावधीत मदतकार्य करण्यात आले. तसेच शैक्षणिक उपक्रम चांगल्या पध्दतीने राबविले जातात. रोटरीने शिक्षकांचा केलेला गौरव हा सिंधुदुर्गच्या शैक्षणिक प्रगतीत हातभार लावण्यासाठी घेतलेले व्रत असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. यामाध्यमातून सिंधुदुर्गातील शिक्षकांना चांगल्या कामाची पोचपावती देण्यात आली असे सांगुन शिक्षकांच्या कामांचा त्यांनी गौरव केला. यावेळी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. संग्राम पाटील, डी. एल. सी.सी. रो. नरीदर बरवाल, डी. सी.सी. लिट्रसी रो. गजानन कांदळगावकर, असीस्टंट गव्हर्नर रो. शशिकांत चव्हाण, इव्हेंट चेअरमन एकनाथ पिंगुळकर, कुडाळ रोटरीचे अध्यक्ष अभिषेक माने, कणकवलीचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, प्रशांत कोलते, देवगडचे हनीफ मेमन आदीसह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page