सावंतवाडी /-

पंतप्रधान आवास घरकुल योजनेत तालुक्यात दुसरा पटकवील्याने ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.शासनाकडून बेघर व मातीची घरे असणाऱ्या कुटुंबाकरीता पक्की घरे बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजना च्या माध्यमातून घरकुला करीता अर्थ सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या योजनेत ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेमध्ये ज्या लाभार्थ्यांनी पक्की घरे बांधली आहेत. त्या घरांचा तालुकास्तरीय स्पर्धेसाठी मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतने मे 2021 मध्ये अहवाल सादर केला होता. सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून पाठविलेल्या घरकुल योजनेतील प्रस्तावात मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतीने पाठवलेल्या घरकुल प्रस्तावाला तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आमदार दीपक केसरकर व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.तालुक्यातील या मिळालेल्या यशाबद्दल ग्रामपंचायत च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर उपसरपंच हेमंत मराठे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्राम विस्तार अधिकारी अनंत गावकर यांनी गावातील ग्रामस्थांमुळे हे यश संपादित झाल्याने ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page