मुंबई /-

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन शोधण्यासाठी व्हॉटस्ॲप चॅटची मदत घेतली गेली. रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोन यांचेही व्हॉटस्ॲप चॅट तपासले गेले.त्यानंतर आता आर्यन खानचेही २०१७ च्या व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून क्रूझ प्रकरणी वेगवेगळे दावे केले जात आहेत. पण यातून प्रश्न निर्माण होतो की व्हॉटस्ॲप चॅट इतरांना वाचता येते का? प्रायव्हसी आणि एंड टू एंड इन्क्रिप्शनचे गौडबंगाल काय आहे.व्हॉट्सॲपची पॉलिसी काय?
आपण व्हॉटस्ॲपवर करीत असलेलो चॅटिंग हे इतर कोणालाही वाचता येत नाही. ते ‘एंड टू एंड इन्क्रिप्टेड’ असते. थर्ड पार्टी बॅकअपसाठीही अशा कोडिंगची सुविधा असते. हा डाटा अत्यंत सुरक्षित असतो असे व्हॉटस्ॲपचे म्हणणे आहे. व्हॉटस्ॲप कंपनीलाही तुम्ही केलेले संभाषण वाचता येत नाही, असा कंपनीचा दावा आहे.बॅकअप घेतलेच नाही तर?
इतर कोणी आपले चॅट वाचू नये असे वाटत असेल तर बॅकअपचा पर्याय बंद करा; कारण तुम्हाला जर कधी चॅट बॅकअप हवा असेलच तर व्हॉट्सॲपला विनंती करता येते.

बॅकअपचा फायदा आहे का?
समजा, आपले व्हॉटस्ॲप डिलिट झाले तर मागील सर्व चॅट पुन्हा मिळविण्यासाठी या बॅकअपचा फायदा होतो. मग, आर्यनचे २०१७ चे चॅट आले कुठून?
तुम्ही जर चॅट बॅकअप घेत असाल तर ते लीक होण्याची शक्यता अधिक आहे.तुम्ही केलेले चॅटिंग बॅकअपमध्ये सेव्ह असेल आणि ती बॅक फाईल जर कोणाच्या हाती लागली तर सहज चॅट वाचता येईल. दरम्यान, तुम्ही जरी ते चॅट डिलिट केले असतील तरी समोरच्या व्यक्तीच्या बॅकमधूनही ते चॅट मिळू शकतात. आर्यनचे चॅट असेच बॅकअपमधून मिळाल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page