कुडाळ /-

बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’ अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि शेकडो हिंदूंवर आक्रमण केले.बांगलादेश हा मुसलमान बहुल तथा इस्लामी देश असल्यामुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंची संपत्ती, जागा आणि महिलांची अक्षरश: लूट केली जात आहे. तेथील सरकार ‘हिंदूंचे रक्षण करू’ असे सांगत असले, तरी तेथील धर्मांधांना ते रोखू शकत नाहीत.

आज दिलेल्या निवेदनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील मागण्या करण्यात आल्या.

  1. जगभरात भारत हा एकमेव हिंदूंचा देश आहे. या नात्याने जगभरातील हिंदु समाजाची नैतिक जबाबदारी भारत सरकारची आहे. या दृष्टीने बांगलादेशमधील हिंदू समाजाला सुरक्षा पुरवावी, यासाठी भारत सरकारने तात्काळ बांगलादेशच्या पंतप्रधानांशी थेट संवाद साधावा.
  2. हिंदूंवर हिंसक आक्रमणे करणार्‍या, मूर्तींचे भंजन करणार्‍या, दुर्गापूजा मंडप उद्ध्वस्त करणार्‍या धर्मांधांना शोधून काढावे, त्यांच्यावर आणि त्यांच्या सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
  3. भारत सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचारांबाबत ‘संयुक्त राष्ट्रा’त मुद्दा उपस्थित करून या देशांवर दबाव निर्माण करावा.
  4. हिंदूंना सुरक्षा पुरवली नाही किंवा असेच चालू राहिले तर, बांगलादेशाशी सर्व प्रकारचे संबंध संपुष्टात येतील, तसेच त्यांच्यावर निर्बंध लादण्यात येतील, अशी ताकीद बांगलादेशच्या सरकारला द्यावी.

यावेळी डॉ. संजय सामंत, विवेक पंडित, उदय अहिर, चंद्रकांत शिरसाट, गुरुदास प्रभू, गणेश कारेकर, अमित राणे, प्रथमेश दळवी, प्रकाश बरगडे, माधवजी भानुशाली, अनिष सावंत, प्रल्हाद नाईक, हर्शल नाईक, निखिल पाटकर, भूषण बाकरे, दैवेश रेडकर, रमाकांत नाईक, आनंद नाईक आदी शिवप्रेमी व हिंदुत्ववादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page